Headlines

मुलीला MBAसाठी पुण्यात सोडून घरी निघाले, वाटेत ट्रकच्या धडकेत सहा जणांचा करूण अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश| Maharashtra Times


Samruddhi Highway: सोमवारी पहाटे वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर इथेनॉलने भरलेला एक ट्रक उलटला यामुळे काही क्षणातचं एक भीषण अपघात झाला. दुसऱ्या भरधाव आयशर ट्रकने एका चारचाकीला धडक दिली. या अपघातात गाड्यांचा चेंदामेंदा झाला.

समृद्धी महामार्ग अपघात
वर्धा: समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे एका भरधाव ट्रकने चारचाकीला चिरडल्यामुळे एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील एकाच कुंटुंबातील तिघांचा, कार चालक आणि ट्रकमधील दोघांचा समावेश होता. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

सोमवारी मध्यरात्री एक इथनॉलने भरलेला ट्रक मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर पलटला त्यामुळे संपूर्ण महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. काही क्षणातचं मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने एका चारचाकीला धडक दिली. या धडकेत गाडीती चौघांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी तीन प्रवासी एकाच कुटुंबातील होते व चौघंही वर्धा जिल्ह्यातील रहिवासी होते. यासह ट्रकमधील दोघांचाही जागीच अंत झाला.

Maharashtra TimesMumbai BEST Bus Accident: भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वीरूळ इंटरचेंजवळ या आयशर ट्रकने चारचाकीला पहाटे ३च्या सुमारास धडक दिली. या वेळी चाराचकीमध्ये राजेश टिपले त्यांची मुलगी जान्हवी टिपले, पत्नी सुषमा टिपले आणि चालक अंकुश राऊत हे बसले होते. राजेश टिपले यांना दोन जुळ्या मुली आहेत. त्यापैकी एकीला पुण्यात उच्च शिक्षणासाठी एमबीएला प्रवेश मिळाला होता. तिला पुण्यात सोडून कुंटुंबातील इतर चौघं जण वर्ध्याहून पुण्याला निघाले होते. त्याचवेळी काळाचा घात झाला आणि हा भीषण अपघात झाला. कुटुंबातील तिघं जण मुलीला मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला म्हणून आनंदात पुण्याला निघाले होते. क्षणात त्यांचं स्वप्न भंग झालं. शिवाय राजेश यांच्या दुसऱ्या मुलीने आपले आई-वडील आणि तिच्या सख्ख्या जुळ्या बहिणीला गमावल्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण टिपले कुटुंबात शोकाकुलता पसरली आहे.

ट्रकमधील दोघांचाही मृत्यू

दरम्यान, मिरच्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये ट्रकचालक व अजून एक सहप्रवासी होता. धडकेमुळे ट्रकला आग लागली. या दोघांचाही या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक चालकाचं नाव संजय कुमार असून तो उत्तर प्रदेशात धनाजीपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. दुसरा प्रवासी क्लीनर असून त्याचं नाव समरजित पाल असं होतं व तो उत्तर प्रदेश राज्यात गडहरियनपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Maharashtra TimesAccident News : आयशरला धडकून कारचा चेंदामेंदा, शासकीय सेवेतील दोघा चुलत भावांचा करुण अंत, पत्रा कापून बाहेर काढण्याची वेळ

मुलीच्या आयुष्यातील इतका मोठा टप्पा गाठून तिला शुभेच्छा देऊन पुन्हा घरी निघाले असताना काळाने झडप घेतली. मुलगीही आपलं शिक्षण आणि पुण्यात आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी उत्साही होती. परंतु, तिच्या उत्साहाचं अवघ्या काही तासांमध्ये दुःखात रुपांतर झालं.

महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे एक-दोन नव्हे तर चारही कुंटुंब उध्वस्त झाली आहेत. असे अपघात रोखण्यासाठी कशी सावधगिरी बाळगली पाहिजे, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा