उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभेला ४० हजार मतांची लीड दिली नाही तर राजकारण सोडेन असा शब्द पटेल यांनी दिला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अंधेरीतील युवासंवाद कार्यक्रमादरम्यान पटेल यांनी हे विधान केलंय.