![]()
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा, अशी मागणी भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे. मराठवाड्यात जून व जुलै महिन्यात झालेल्या अल्प व खंडित पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बबनराव लोणीकर यांनी पत्रात काय म्हटले? बबनराव लोणीकर यांनी राज्यसरकारला एका पत्राद्वारे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, मराठवाड्यात जून व जुलै महिन्यात अत्यल्प व खंडित पाऊस झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह सर्व खरीप पिके गंभीर संकटात सापडली आहेत. जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. विहिरी व बोअरवेल आटत असल्याने पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा यांचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन दि. 31 जुलै 2026 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याची मुदत किमान 15 दिवसांनी वाढविण्याची मागणी मी पत्राद्वारे आपणाकडे केली होती. आपल्या सकारात्मक निर्णयामुळे सदर मुदतवाढ मिळाली, याबद्दल बबनराव लोणीकर यांनी आभारही मानले आहेत. पुढे बबनराव लोणीकर पत्रात म्हणतात, मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून केवळ मुदतवाढ पुरेशी नाही. त्यामुळे पुढीलप्रमाणे तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे असे वाटते, शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊन आपण तात्काळ कार्यवाही कराल याची मला खात्री आहे : मराठवाड्यातील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत असून शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन पीक विमा, विशेष आर्थिक पॅकेज, कर्ज सवलत तसेच पाणी व चारा उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
Source link
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा:भाजप नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
