Headlines

मन मोठं लागतं! कॅप्टन झाल्यावर मिळालेल्या पहिल्या विजयाचे दोघेच शिलेदार, श्रेयस अय्यरने जाहीरपणे घेतली नावे, पाहा कोण?


Shreyas iyer first win against zimbabew he captain of team India : भारतीय संघाच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाची धुरा हाती आल्यापासून श्रेयस अय्यरने दोन मालिका गमावल्या होत्या. मालिका सोडाच पण त्याला विजयही नावावर करता आला नव्हता. त्यामुळे या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यावर खेळाडूंना चिलखत घातल्यासारखं वाटत असेल, पण ही तर सुरूवात केल्यावर पहिल्या विजयाचे श्रेय दोन खेळाडूंना दिले आहे.

Slhreyas Iyer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : हरारे स्पोर्ट्स क्ल्ब येथे पार पडलेल्या भारत आणि झिम्बाब्वे सामन्यात यजमानांचा सात विकेटने पराभव झाला. भारताने या सामन्यामध्ये सांघिक कामगिरी करत सहज विजय मिळवला. सलग आठ टॉस जिंकत आलेल्या श्रेयस अय्यर याने आज आपल्या करियरमधील पहिला सामना जिंकला. आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धची मालिका गमावल्यावर भारताने पहिला विजय साकारला. भारतीय संघाला त्या दोन देशांविरूद्ध एकही सामना जिंकता आलेला नव्हता. मात्र आज पहिलाच सामना खिशात टाकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना जिंकल्यावर कॅप्टन श्रेयस अय्यर याने आपली प्रतिक्रिया देताना काय म्हटलं आहे, जाणून घ्या.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

आजचा विजय खास आहे, माझा नेतृत्त्वातील पहिला विजय असल्याने खूप आनंदी आहे. संघातील सर्व खेळाडूंनी परिस्थितीशी जुळवून घेतले. मला वाटलंच होतं की पिचवर बाऊन्स असेल, दोन्ही डावांवेळी हेच दिसलं. मयंकने आपल्या लेंथवरच मारा केला, त्याने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना धावा काढण्याची संधीच दिली नाही. त्यानंतर वैभवने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली. वैभव हा निडर खेळाडू आहे त्याने केलेली फलंदाजी ही अफलातून होती. या मैदानावर खेळण्याचा त्याला अनुभव होता. त्यामुळे इथल्या परिस्थितीचा अंदाज होताच, अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभवने १७५ धावांची खेळी केली होती. त्यामुळेच त्याला मैदानामध्ये उतरण्याआधीच आत्मविश्वास होता. आज त्याला खेळताना पाहून आनंद झाला आणि मालिकेची सुरूवातही चांगली झाल्याचं श्रेयस अय्यर याने म्हटलं आहे.
Maharashtra TimesShreyas Iyer : श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा विक्रम; टी-20 कर्णधार म्हणून रचला ऐतिहासिक विक्रम
प्रत्येक संघात एक असा खेळाडू असतोच जो अशा सामन्यांमध्ये चांगली धावसंख्या उभारून देतो. झिम्बाब्वेकडून भागीदारी केलेल्या फलंदाजांनी खेळपट्टी ओळखली आणि भागीदारी बनवली. त्याचवेळी मी गोलंदाज बदलून पाहिले, कारण सर्वांना खेळपट्टीचा अंदाज यायला हवा. याच मैदानावर पुढील दोन सामने होणार असल्याचं अय्यरने सांगितलं.
Maharashtra TimesIND vs ZIM 1st T20 : वर्ल्ड कपनंतर भारताचा पहिलाच विजय, झिम्बाब्वे 7 विकेटने पराभूत; श्रेयसने खातं उघडलं, मॅन ऑफ द मॅच कोण?
दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये मयंक यादव याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मयंकने आपल्या ४ ओव्हरमधील १७ चेंडू निर्धाव टाकत दोन विकेटही घेतल्या. तर दुसरीकडे वैभवने १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत झिम्बाब्वेला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलेले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा