एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी संयमाची भूमिका घेतली. तसेच मनोज जरांगे यांची तळमळ आपल्याला माहिती आहे, असं म्हणत त्यांनी मराठा आंदोलकांना भावनिक साद घातली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कार्यक्रमस्थळी काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी भाषण करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना हे आपलेच लोकं आहेत. त्यांना इकडे येऊ द्या. त्यांना इथे बसू द्या. बाकी सर्वजण खाली बसा, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. दुसरीकडे मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही आंदोलक बॅरिकेट्सवरुन उडी मारुन मंचाच्या दिशेला जाताना दिसले. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने गोंधळ शांत झाला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज परभणीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार बंडू जाधव यांच्याकडून या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या कार्यक्रमाला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. ते कालपासून उपोषणाला बसले आहेत.
एकीकडे जरांगे मराठवाड्यात उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातच जंगी शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यक्रमाला विरोध केला. त्यांनी बंडू जाधव यांना फोन करुन संबंधित कार्यक्रमाचं आयोजन करु नये, असं आवाहन केलं. पण बंडू जाधव यांनी कार्यक्रमाचं नियोजन पूर्ण झालं आहे. सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे कार्यक्रम रद्द करणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
शिंदेंच्या भाषणावेळी काय घडलं?
यानंतर मनोज जरांगे यांनी मेळावा उधळून लावू, असा इशारा दिला. पण जालन्याहून परभणीला त्यासाठी जाणं शक्य नसल्याने जरांगे यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यांनी बंडू जाधव यांच्यावर सडकून टीका केली. या सर्व घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडत होता. एकनाथ शिंदे भाषणाला उभे राहिले. ते भाषण करु लागले आणि मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे यांच्या सामंजस भूमिका आणि पोलिसांच्या मध्यस्थीने गोंधळ निवळला. या दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांचा उल्लेख आपल्या भाषणात करत भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे जरांगेंबद्दल काय म्हणाले?
“हा शेतकरी मेळावा आहे. बंडू जाधव यांनी मगाशी सांगितलं की, हा मेळावा स्थगित करण्यासाठी मनोज जरांगे यांनी फोन केला होता. पण या मेळाव्याची दोन महिन्यांपासून तयारी चालू होती. आज हा मेळावा होतोय. हा बळीराजा आपला अन्नदाता आहे. त्यामुळे कुठलाही राजकारण शेतकऱ्यांच्याआड येता कामा नये ही भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आणि आमचीसुद्धा आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मनोज जरांगे पाटील यांची तळमळ मला माहिती आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता समजासाठी लढतोय. मी मुख्यमंत्री असताना दोनवेळा जरांगेंच्या भेटीसाठी गेलो होतो. आतादेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी कायदेशीर बाबी तपासण्यासाठी आपले मंत्री पाठवले. मराठा समाज हा कष्टकरी आहे. इतर समाजाचं आरक्षण कमी न करता आपल्याला आरक्षण देण्याची भूमिका आम्ही घेतली. कित्येक वर्षांपासून मराठा समजाला आरक्षण मिळावी ही मागणी केली जात आहे. महायुतीच्या सरकारपासून मराठा समाजाला न्याय देण्याच काम झालं”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा