IND vs ZIM 3rd T20 Plaiying 11 News : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसरा सामना झाल्यावर २४ तासातच तिसरा सामना आज पार पडणार आहे. या सामन्यामध्ये भारताच्या प्लेइंग ११ मध्ये चार मोठे बदल पाहायला मिळू शकतात. नेमके ते बदल कोणते आणि कशासाठी जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ईशान किशन, तिलक वर्मा यांची तडाखेबंद । अर्धशतके आणि अभिषेक शर्मा, यश ठाकूर, प्रिन्स यादव यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने शनिवारी टी-२० क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेवर ९० धावांनी मात केली. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. आज म्हणजेच २४ तासांनी लगोलग तिसरा टी-२० सामना होणार आहे. मात्र मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघात प्लेइंग ११ मध्ये चार बदल दिसू शकतात. सामना जिंकल्यावरही बदल का आणि कोणाची एन्ट्री होणार जाणून घ्या.
आजच्या सामन्यामध्ये जे चार बदल होऊ शकतात त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे प्रिन्स यादव आहे. कारण शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये तो जखमी झाला होता. उजव्या पाय दुखू लागल्याने ओव्हर अर्धी सोडून मैदानाबाहेर जावं लागलं होतं. प्रिन्सच्या जागी पहिल्या सामन्यामधील पदार्पणवीर अशोक शर्मा याची निवड होईल. दुसरा बदल म्हणजे ऑल राऊंडर खेळाडू शिवम दुबे याच्या जाही सूर्यांश शेडगे याला खेळवण्याची शक्यता आहे. तिसरा सर्वात मोठा बदल म्हणजे अभिषेक शर्माला बसवलं जाऊ शकतं. गेल्या दोन सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या जागी प्रभसिमरन सिंग याला संधी देतील. चौथा खेळाडू म्हणजे रवी बिश्नोई असून त्याच्या जागी हर्ष दुबे याला घेतील. तसंही रवी फारसा प्रभावी वाटला नाही. त्यामुळे हे चार बदल निश्चित होऊ शकतात.
खेळ आकड्यांचा…
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताचा पहिला टी-२० मालिका विजय
झिम्बाब्वेचा चौथ्यांदा नव्वद किंवा त्याहून अधिक धावांनी टी-२०मध्ये पराभव. यापूर्वी, वेस्ट इंडीज (१०७ धावांनी), ऑस्ट्रेलिया (१००) आणि भारताविरुद्ध (१००) झिम्बाब्वेचा नव्वदहून अधिक धावांनी टी-२० मध्ये पराभव.
या वर्षी भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये नवव्यांदा दोनशे किंवा त्याहून अधिक ९ धावा केल्या. अशी कामगिरी भारताने दुसऱ्यांदा केली. यापूर्वी, २०२४मध्येही भारताने नऊ वेळा टी-२० क्रिकेटमध्ये दोनशे किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या. अशी कामगिरी करणारा भारत एकमेव संघ.
दुसऱ्या सामन्याचा धावता आढावा
हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये ही लढत झाली. भारताने झिम्बाब्वेसमोर २२० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव १२९ धावांत आटोपला. भारतासाठी समाधानकारक विजय ठरला. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दडपण आणले आणि सहज विजय साकारला. प्रिन्स यादवने आठ चेंडूंत दोन विकेट घेतल्या, पायाचा स्नायू दुखावल्याने, त्याला मैदान सोडावे लागले.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा