IND vs ENG 3rd T20 News : भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा टी-२० सामना उद्या म्हणजेच मंगळवारी असणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहण्यासाठी सगळे आतुर आहेत. मात्र हा सामना नेमका किती वाजता सुरू होणार जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील तिसरा टी-२० सामना उद्या म्हणजेच मंगळवारी असणार आहे. या सामन्यामध्येही वैभवला खेळवणार हे निश्चित मानले जात आहे. वैभवची तुफान फटकेबाजी पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. दुसऱ्या सामन्यात गड्याने सुरूवात केली होती पण अपयशी ठरला. मात्र सर्वांना वैभवकडून अपेक्षा असून हा सामना रात्री दहा वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. ट्रेंट ब्रिज नॉटिंगहॅम येथे पार पडणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारत पराभूत झाला. आयर्लंडविरुद्धचे दोन्ही सामनेही भारताने गमावले होते. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये २ बाद ६५ अशी सुरुवात करूनही ७ ते १० षटकांच्या दरम्यान भारताला ३२ धावा करता आल्या. या मंदावलेल्या गतीमुळे भारताच्या डावाला ‘ब्रेक’ लागला; तसेच १४ ते १७ या चार षटकांमध्ये भारतीय फलंदाजांना केवळ २३ धावा जोडता आल्या. Womens World Cup Winner 2026 : वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा मारली बाजी, इंग्लंडवर घरच्या मैदानावर 7 विकेटने मात, कोणी फिरवली मॅच? ‘भारताला मधल्या षटकांमध्ये धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. यासाठी इंग्लंडमधील परिस्थितीशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घ्यावे लागणार आहे,’ अशी प्रतिक्रिया भारताचा आक्रमक फलंदाज ईशान किशनने व्यक्त केली. भारतीय क्रिकेट संघास सलग चार टी-२० सामन्यांत हार पत्करावी लागली. ‘इंग्लंडकडे गोलंदाजीत सर्वोत्तम पर्याय आहेत. कोणता गोलंदाज कधी वापरायचा किंवा कोणती रणनीती आखायची हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते येथील परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजतात. भारताची धावसंख्या किमान वीस धावांनी वाढण्याची गरज आहे, हे प्रत्येक फलंदाजाने समजून घेणे गरजेचे आहे, असे किशनने नमूद केले. Vaibhav Sooryavanshi : काय सांगता! पहिल्या मॅचमध्ये वैभवच्या 14 धावा पण सचिनसोबतचा योगायोग चक्रावून टाकणारा, नेमका काय? १५ वर्षे आणि ९९ दिवस वय असलेला वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा तब्बल ३७ वर्षे जुना विक्रम मोडला. ईशान किशन म्हणाला, ‘तो गेल्या दोन वर्षांपासून खूप चांगली कामगिरी करत आहे आणि संघात आल्यावर त्याने तो फरक दाखवून दिला आहे. जेव्हा तुमच्या लक्षात येते की एखादा खेळाडू किती प्रतिभावान आहे, तो संघात काय बदल घडवून आणू शकतो आणि त्याच्याकडे कोणता ‘एक्स-फॅक्टर आहे, तेव्हा एक वरिष्ठ खेळाडू म्हणून तुम्ही फक्त त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करता. अशी कोणतीही वेळ येऊ नये जिथे त्याची मानसिकता बदलेल. त्याने लहान वयातच मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.’
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा