Gautam Gambhir News : भारतीय संघाचा इंग्लंडविरूद्ध मानहानिकारक पराभव झाला. या पराभानंतरही कोच गंभीरचं असं म्हणणं आहे की, आता नवीन संघ बनवत असल्याने असे निकाल येऊ शकतात. सामना संपल्यावर पत्रकार परिषदेत बोलताना त्याने एका खेळाडूचे कौतुक करताना त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचं सांगितलं आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वर्ल्ड कप २०२६नंतर भारतीय संघाला एकही विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडनंतर आता इंग्लंडची मालिका गमवावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारतीय संघ ७६ धावांवर ऑल आऊट झाला.वर्ल्ड कप विजेत्या संघाची झालेली अवस्था पाहून चाहत्यांनी कोच गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरवरच्या नेतृत्त्वावर टीका करायला सुरूवात केली आहे. फॉर्ममध्ये नसल्याने सू्र्यकुमार यादव याला फक्त कर्णधारपदावरूनच हटवले नाहीतर तर त्याला संघातही जागा दिली नाही. मात्र आता एक विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ तरसताना दिसत आहे. भारताने सूर्याच्या नेतृत्त्वात गेल्या अडीच एकही टी-२० मालिका गमावली नव्हती. मात्र आता आयर्लंड दौऱ्यावर व्हाईटवॉशनंतरही भारताने सलग दोन सामने गमावले आहेत. तिसरा सामना गमावल्यावर कोच गंभीरने नवीन संघ तयार करताना असे निकाला पाहायला मिळू शकतात असे म्हटले आहे. त्यासोबतच तिसऱ्या सामन्यात पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळणाऱ्या खेळाडूचे कौतुक करताना त्याचे भविष्य असल्याचं त्याने म्हटलं आहे.
गौतम गंभीर काय म्हणाला?
आम्ही चांगले प्रदर्शन नाही केले, वर्ल्ड कपची फायनल खेळलेला संघ पूर्णपण वेगळा होता आणि आताच्या संघात अनेक बदल आहेत. त्यामुळे नवीन संघ तयार करण्यासाठी थोडा वेळ लागणारच,१५ वर्षांच्या वैभवने करियरला सुरूवात केली, हर्षित राणा दुखापतीनंतर कमबॅक करत आहे. आपल निकाल काय लागतो हेच पाहतो यात काही शंका नाही पण पण आपल्याला व्यावहारिकही असायला हवं, असं गौतम गंभीर म्हणाला. IND vs ENG 3rd T20 : भारताचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव, 76 धावांवर ऑल आऊट; वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल, सामना कुठे फिरला? जेव्हा संघात स्टार खेळाडू तयार करत असता त्यावेळी असे निकाल पाहायला मिळू शकतात. कारण खेळाडूंनाही त्यांचा खेळ बहरून देण्यासाठी वेळ द्यावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे स्टार खेळाडू करण्यासाठी वेळ हा लागतोच. मला माहिती नाही की इंग्लंड बाकी सामन्यांमध्ये काय करणार आहे पण आम्हाला वेगवान गोलंदाजांविरोधात चांगली कामगिरी करायला हवी. प्रिन्स यादव याचा दुसराच सामना होता त्याने ३० धावा देत विकेट घेतल्या. फक्त आकडे पाहणं सोपं आहे पण त्याने डेथ ओव्हर, पॉवर प्ले आणि अवघडवेळी बॉलिंग केली. दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याने केलेली बॉलिंग पाहून हे दिसून येतं की त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मला आशा आहे की तो मेहनत घेईल आणि आणखीन चांगले प्रदर्शन करेल, असं म्हणत गंभीरने प्रिन्स यादवचे कौतुक केले. IND vs ENG 3rd T20 : तिसऱ्या टी-20मध्ये प्रिन्स यादवच्या घातक यॉर्करवर बटलरचे डोळे फिरले, सगळेच शॉक; Video एकदा पाहाच दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावासामुळे रद्द झाला होता. पण त्यानंतर भारताने सलग दोन सामने गमावले आहे. इंग्लंडने २-० ने आघाडी घेतलीय. संजूला सॅमसनला खाली बसवले परंतु त्याचा काही निकालावर परिणाम दिसला नाही. आता चौथ्या सामन्यात कोणते बदल पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा