Chhatrapati Sambhajinagar News: ऐन पावसाचे दिवस चालू असाताना मराठवाड्यात मात्र कित्येक गाव पाण्यासाठी तहानलेली आहेत. जुलै संपला तरी पावसाने मात्र मराठवाड्यात पाहिजे तशी उपस्थिती दर्शवलेली नसल्याने भर पावसात ११४ टँकर द्वारे गावांना टप्प्याटप्प्याने पाणी पुरवले जात आहे.

तहानलेल्या गावांना ट्रँकरद्वारे पाणी
निम्मा जुलै महिना संपला तरी मराठवाड्यातील तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरूच आहे. आजघडीला छत्रपती संभाजीनगरसह अन्य तीन जिल्ह्यांतील मिळून एकूण ५१ गावे आणि ४८ वाड्यांना ११४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय मराठवाड्यात ४४३ विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालया प्रशासनातर्फे देण्यात आली. तर उर्वरित चारही जिल्हे टँकरमुक्त आहेत.
जिल्हे टँकरमुक्त होतील अशी अपेक्षा पण अपेक्षाभंग
उन्हाळा सुरू होताच यंदाही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेल्या गावांना टप्प्याटप्प्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला. पावसाळा सुरू झाल्यावर टँकरचा प्रश्न निकाली लागेल आणि जिल्हे टँकरमुक्त होतील, अशी अपेक्षा होती.
जूननंतर देखील टँकरचा आधार
परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही आणि जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जूननंतर देखील टँकरचा आधार घ्यावा लागला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांत ९२ गावे, ३६ वाड्यांना १५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जून, जुलै महिन्यात यात वाढ झाल्याने एकही जिल्हा टँकरमुक्त नव्हता.
३०३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता
जूनअखेर छत्रपती संभाजीनगरातील टँकर बंद करण्यात आले होते; परंतु ग्रामस्थांनी मागणी केल्याने टँकर पुन्हा सुरू करावे लागले. १४ जुलैदरम्यान विभागातील तहानलेल्या गावांना ३०३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता.
पावसाने खंड दिल्याने टंचाई जाणवत आहे
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परभणी वगळता विभागातील उर्वरित सात जिल्ह्यांतील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्यांना ४२८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या संख्येत घट झाली. छत्रपती संभाजीनगरसह परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्हेदेखील टँकरमुक्त झाले. पावसाने खंड दिल्याने टंचाई जाणवत आहे.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा वगळून मराठवाड्यातील उर्वरित चार जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १८ ऑगस्टच्या अहवालानुसार, एकूण ४४३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात ३०, बीड २०, लातूर २१०, तर धाराशिव जिल्ह्यातील १८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

