Headlines

बॉक्स ऑफिसवर यशची हवा, प्रेक्षकांची ‘Toxic’ला पसंती; दुसऱ्या दिवशी सिनेमानं केली बक्कळ कमाई


Toxic Box Office Collection : दाक्षिणात्य अभिनेता यशच्या ‘टॉक्सिक’ या सिनेमानं दुसऱ्या दिवशी किती कमाई केली, जाणून घेऊया.

Toxic Box Office collection
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – रॉकिंग स्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ टॉक्सिक : अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ २६ ऑगस्टला प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे. यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा आणि हुमा कुरेशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटानं दुसऱ्या दिवशीही भरघोस कमाई केली आहे.

दुसऱ्या दिवशी १०० कोटींचा टप्पा पार

सॅकनिल्क रिपोर्टनुसार, ‘टॉक्सिक’नं भारतात दुसऱ्या दिवशी जवळपास ११७.५८ कोटींची नेट कमाई केली आहे. यामध्ये दुसऱ्या दिवशीची कमाई जवळपास १६.४८ कोटी आहे. मात्र, दिवसाची अंतिम कमाई अद्याप समोर आली नाही. पहिल्या दिवशी चित्रपटानं भारतात १०१ कोटींची नेट कमाई केली होती. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा सहज पार केला आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe On Pan Masala Ad : FDA नं अजय, शाहरुख आणि टायगर यांना केलं सॉफ्ट टार्गेट? तुकाराम मुंढे म्हणाले, ‘उत्पादक आणि विक्रेत्यांवरही कारवाई सुरू आहे’

पहिल्याच दिवशी जगभरात १४० कोटींचा गल्ला

‘टॉक्सिक’च्या पहिल्या दिवसाची वर्ल्डवाइड कमाई १४० कोटी झाली. चित्रपटाला कन्नडसोबत हिंदीसह विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं असून, त्याच्या पॅन-इंडिया रिलीजचा बॉक्स ऑफिस कमाईला मोठा फायदा होताना दिसत आहे.

Maharashtra TimesOmkar Karve : अचानक मालिकेतून काढलं, आर्थिक तंगीमुळे केली शेती, झालं नुकसान; उदरनिर्वाहासाठी विकली रद्दी, मराठी अभिनेत्यानं सांगितला संघर्ष काळ

यशसोबत मोठी स्टारकास्ट

‘टॉक्सिक’मध्ये यश मुख्य भूमिकेत असून कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं आहे. यशच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता होती. ‘KGF 2’नंतर यशचं मोठ्या पडद्यावरील महत्त्वाचं कमबॅक असल्यामुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची मोठी चर्चा होती. दोन दिवसांत ११७ कोटींपेक्षा अधिक नेट कमाई झाल्यामुळे आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वीकेंडमध्ये ‘टॉक्सिक’ किती मोठा आकडा गाठतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्याचा वेग कायम राहिल्यास चित्रपटाच्या कमाईत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

‘टॉक्सिक’ चित्रपटाची कथा काय आहे?

‘टॉक्सिक’ चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपट अॅक्शननं परिपूर्ण असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी, त्याची कथा कमकुवत ठरली. चित्रपटाची कथा १९४० ते १९७० च्या दशकातील गोव्यामध्ये घडते. राया (यश) गुन्हेगारी, तस्करी आणि सत्तेच्या जगात आपलं साम्राज्य उभारतो. ही कथा त्याचे आई-वडील आणि बहीण गंगा (नयनतारा) यांच्यासोबतचे त्याचे नातेसंबंध देखील उलगडते.