Headlines

बांगलादेशविरूद्ध तोफखाना घेत उतरलेली ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर पण भारताची चिंता का वाढली?


BAN vs AUS Test News : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमधील कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिला दिवस खऱ्या अर्थाने बांगलादेशच्या नावावर राहिला. स्टार्क, जोश हेझलवूड, कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स या तोफखान्याला घेऊन मैदानात उतरलेल्या कांगारूंना बांगलादेशने बॅकफूटवर ढकललं. मात्र भारतासाठी ही चांगली बातमी का नाही? याचं कारण जाणून घ्या.

BAN vs AUS Test
BAN vs AUS Test News(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गुरुवारपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया-बांगलादेश मालिकेतील सलामीच्या कसोटी क्रिकेट सामन्याचा पहिला दिवस गाजला. बांगलादेशच्या टायगर्सने कांगारूंना बॅकफूटवर ढकलंल. मात्र यामुळे श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाची चिंता काहीशी वाढली असेल. याला कारणही तसेच आहे. ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळल्यानंतर बांगलादेशने दिवसअखेरीस १ बाद ९६ अशी मजल मारली. ऑस्ट्रेलियात कसोटी विजयाची नोंद करत कसोटी जगज्जेतेपदाच्या सामन्याकडे कूच करण्याचे बांगलादेशचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक कसोटीच्या गुणतकत्यात बांगलादेश सध्या भारताच्यापुढे चौथ्या क्रमांकावर आहे.

गोलंदाज हसन महमूदच्या ६ विकेटमुळे बांगलादेशने गुरुवारी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात १९८ धावांत गुंडाळले, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वाधिक कसोटी विकेट टिपणारा डावखुरा गोलंदाजही ठरला. ऑस्ट्रेलिया मोठ्या कालावधीनंतर मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स अशा तोफखान्याला घेऊन पूर्ण ताकदीनीशी उतरला आहे. तरीही बांगलादेश त्यांना कडवी लढत देत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचे वेगवान गोलंदाज हुकूमी नाण्यासारखे चमकत असताना ऑस्ट्रेलियाचा प्रभावी मारा मात्र आपल्याच मैदानात निष्प्रभ ठरला.

Maharashtra TimesHarbhajan Singh : ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका इतिहासजमा होणार, एक गोष्ट ठरेल कारणीभूत’; हरभजन सिंग असं का म्हणाला?
या मालिकेआधीच्या सराव सामन्यात ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघाने बांगलादेशला दुसऱ्या डावात ५४ धावांत गुंडाळत डावाने सरशीही साधली होती. मात्र ऐन कसोटी सामन्यात बांगलादेशने कामगिरी उंचावली. यामुळे शनिवारपासून रंगणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीस सामोरे जाताना डार्विनमधील बांगलादेश ऑस्ट्रेलिया सामन्यावरही भारतीय संघाची नजर असू शकते.

डावखुऱ्या स्टार्कने घडविला इतिहास

कसोटीचा पहिला दिवसाचा खेळ संपण्याआधी ऑस्ट्रेलियाकडून अनुभवी मिचेल स्टार्कने शादमन इस्लाम याला बाद केले. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट टिपणारा तो पहिला डावखुरा गोलंदाज ठरला. त्याने श्रीलंकेचा माजी गोलंदाज रंगना हेराथ याला (४३३) मागे टाकले आहे. स्टार्कच्या नावावर आता ४३४ कसोटी विकेट आहेत.

Maharashtra TimesRohit Sharma : रोहित शर्माचा शो अन् निवृत्तीचे संकेत, वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही? जाणून घ्या?

बांगलादेश दौरा रद्द ?

अफगाणिस्तान बोर्डाच्या या अधिकृत घोषणेमुळे आता भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सहा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी १ ते १३ सप्टेंबर हा कालावधी निश्चित केला होता. मात्र, अफगाणिस्तान मालिकेतील किमान एक सामना या कालावधीशी जुळत आहे. त्यामुळे बांगलादेश दौरा रद्द होईल.

Maharashtra TimesIND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, अज्जू नव्या इनिंगसाठी सज्ज; जाणून घ्या
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. ही मालिका अफगाणिस्तानच्या ‘फ्युचर टूर्स प्रोग्राम’चा भाग आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या लढती गेल्या काही वर्षांत भारतातच होत आहेत. या तीन लढती अनुक्रमे १३, १५ व १७ सप्टेंबरला होणार आहेत. तिन्ही लढती येथील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा