Headlines

फ्रिज साफ करायला गेली आणि क्षणात होत्याच नव्हत झालं, एक छोटीशी चूक भारी पडली – fridge blast videos viral how to clean fridge from inside in 10 minutes kitchen hacks


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फ्रिज साफ करताना एका महिलेचा विजेचा धक्का लागल्याची धक्कादायक घटना दिसत आहे.तिने फ्रिज सुरू अवस्थेत ठेवला असल्याने ओलावा आणि वीज यांचा संपर्क होऊन हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करते.

how to clean fridge
फोटो सौजन्य :- @iStock
फ्रिज साफ करताना एक छोटीशी चूक किती मोठा धोका निर्माण करू शकते, याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला फ्रिज स्वच्छ करण्यासाठी गेली असताना तिला अचानक विजेचा धक्का लागल्याचे दिसते. प्राथमिक माहितीनुसार, फ्रिज साफ करताना तीने फ्रिज सुरू अवस्थेतच ठेवला होता, आणि ओलसर हात किंवा पाण्याचा संपर्क यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे घरगुती उपकरणे वापरताना सुरक्षिततेचे नियम किती महत्त्वाचे आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.आजकाल प्रत्येक घरात फ्रिज हा अत्यावश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरण बनला आहे. अन्न साठवणे, थंड पाणी, फळे-भाज्या टिकवणे यासाठी फ्रिजचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, याचा वापर जितका सोपा वाटतो, तितकीच त्याची काळजी घेताना निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. विशेषतः साफसफाई करताना वीजपुरवठा सुरू ठेवणे, ओले हात वापरणे किंवा चुकीच्या पद्धतीने आत हात घालणे हे गंभीर अपघातांना कारणीभूत ठरू शकते. (फोटो सौजन्य :- @iStock)

व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय आहे

व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय आहे

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी घटना ही एक इशारा आहे की घरगुती काम करताना आपण अनेकदा लहान-सहान गोष्टी दुर्लक्षित करतो, पण त्याचे परिणाम मोठे होऊ शकतात. फ्रिज साफ करताना वीजपुरवठा बंद न करणे ही सर्वात मोठी चूक मानली जाते. फ्रिजमध्ये कंप्रेसर, वायरिंग आणि इतर इलेक्ट्रिकल पार्ट्स असतात. त्यामुळे ओलावा किंवा पाण्याचा संपर्क झाल्यास शॉक लागण्याचा धोका वाढतो.

फ्रिज कसा करावा

फ्रिज कसा करावा

या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, बहुतांश लोकांनी घरगुती सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. काही तज्ज्ञांनी देखील सांगितले की कोणतेही इलेक्ट्रिक उपकरण साफ करण्यापूर्वी त्याचा प्लग काढणे अत्यावश्यक आहे. तसेच, फ्रिज साफ करताना कोरड्या कापडाचा वापर करावा आणि शक्यतो हात ओले नसावेत. फ्रिज साफ करणे ही जरी साधी प्रक्रिया वाटत असली तरी त्यासाठी योग्य पद्धत अवलंबणे गरजेचे आहे. सर्वप्रथम फ्रिजचा प्लग काढावा. त्यानंतर आतले सर्व अन्न बाहेर काढावे. शेल्फ्स आणि ड्रॉअर्स वेगळे करून ते कोमट पाण्यात आणि सौम्य साबणाने धुवावेत. फ्रिजच्या आतील भागासाठी बेकिंग सोडा आणि पाणी यांचे मिश्रण वापरल्यास दुर्गंधी कमी होते आणि स्वच्छताही चांगली होते. साफ केल्यानंतर सर्व भाग नीट कोरडे झाल्यावरच फ्रिज पुन्हा सुरू करावा.
प्लग काढा
फ्रिज साफसफाई सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे त्याचा प्लग काढणे. फ्रिजचा वीजपुरवठा बंद केल्याशिवाय साफसफाई सुरू करू नये, कारण त्यामुळे विजेचा शॉक लागण्याचा धोका असतो. विशेषतः पाणी किंवा ओलावा वापरून साफ करताना ही काळजी अधिक आवश्यक ठरते. प्लग काढल्याने फ्रिज पूर्णपणे बंद होतो आणि सुरक्षितपणे आतून स्वच्छ करता येतो. ही छोटीशी पण महत्त्वाची पायरी अपघात टाळण्यासाठी अत्यंत गरजेची आहे.

सर्व सामन बाहेर काढा

सर्व सामन बाहेर काढा

फ्रिज साफ करताना पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे त्यातील सर्व सामान बाहेर काढणे. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ, बाटल्या, डबे आणि इतर वस्तू बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, जेणेकरून ते खराब होणार नाहीत. विशेषतः दुधाचे पदार्थ आणि लवकर खराब होणारे अन्न थंड ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. फ्रिज पूर्णपणे रिकामा केल्यामुळे आतून नीट आणि सहज साफसफाई करता येते. तसेच कोणतीही वस्तू अडथळा आणत नाही आणि प्रत्येक कोपरा व्यवस्थित स्वच्छ होतो.

फ्रिज साफ करणे

शेल्फ आणि ड्रॉअर्स धुवा

शेल्फ आणि ड्रॉअर्स धुवा

फ्रिजमधील शेल्फ आणि ड्रॉअर्स काढल्यानंतर त्यांची वेगळी साफसफाई करणे खूप महत्त्वाचे आहे. हे भाग कोमट पाणी आणि सौम्य डिश वॉशिंग लिक्विड वापरून नीट धुवावेत. त्यावर चिकटलेली घाण, डाग किंवा अन्नाचे अवशेष मऊ स्पंजच्या मदतीने हळूवारपणे काढावेत. कठीण ब्रश किंवा तीव्र रसायने वापरणे टाळावे, कारण त्यामुळे प्लास्टिक किंवा काचेला इजा होऊ शकते. धुतल्यानंतर हे शेल्फ आणि ड्रॉअर्स पूर्णपणे वाळू द्यावेत, जेणेकरून पुन्हा बसवल्यावर ओलावा राहणार नाही आणि दुर्गंधी निर्माण होणार नाही.

आतून पुसून घ्या

आतून पुसून घ्या

फ्रिजच्या आतल्या भागाची साफसफाई करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. यासाठी कोमट पाणी आणि बेकिंग सोडा किंवा सौम्य डिटर्जंटचे मिश्रण तयार करून मऊ कापड किंवा स्पंजच्या मदतीने आतल्या भिंती नीट पुसून घ्याव्यात. कोपरे, मागचा भाग आणि दरवाज्याच्या रबर सील्समध्ये साचलेली घाण काळजीपूर्वक स्वच्छ करावी. हे करताना जास्त पाणी वापरणे टाळावे, जेणेकरून इलेक्ट्रिक भागांमध्ये ओलावा जाणार नाही. व्यवस्थित पुसल्यामुळे फ्रिजमधील दुर्गंधी कमी होते आणि तो अधिक स्वच्छ व ताजा राहतो.

कोरडे करून परत पुसून घ्या

कोरडे करून परत पुसून घ्या

फ्रिजची साफसफाई पूर्ण झाल्यानंतर सर्व भाग नीट कोरडे करणे अत्यंत आवश्यक आहे. शेल्फ, ड्रॉअर्स आणि आतले भाग पूर्णपणे वाळल्यानंतरच ते पुन्हा योग्य ठिकाणी बसवावेत. ओलावा राहिल्यास दुर्गंधी येऊ शकते किंवा बुरशी तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक भाग नीट तपासून कोरडा असल्याची खात्री करावी. त्यानंतर सर्व भाग व्यवस्थित बसवून फ्रिज बंद करावा आणि काही वेळाने तो पुन्हा सुरू करावा. यामुळे फ्रिज स्वच्छ, सुरक्षित आणि वापरण्यास तयार राहतो.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा