FIFA World Cup 2026 Tickets News : वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा प्रत्येक दिवसागणिक सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच जात आहे. पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्याच्या तिकिटांची किंमत सातत्याने वाढत आहे. सर्वात स्वस्त तिकीट आता किमान तीन लाख रुपयांना उपलब्ध असल्याचे दिसत आहे. त्याची किंमत अजूनच वाढण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कप फुटबॉलमधील सामन्यांचा प्रत्यक्ष आनंद सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असल्याचे अनेक अहवालात नमूद करण्यात आले आहे. अतिश्रीमंतच त्याचा आनंद घेऊ शकतात असे त्यात म्हंटले आहे. तिकीटांच्या महागड्या किंमती तसेच हॉटेलच्या दरामुळे हे घडले आहे. दरम्यान, फिफाने अनधिकृत संकेतस्थळावरून तिकीटांची खरेदी करू नका असा इशारा दिला आहे.
FIFA World Cup : होणाऱ्या बाळाला गमावलं, तरी देशासाठी मैदानात उतरला; जग जिंकणारा गोल केला अन् फुटबॉलपटू ढसाढसा रडला, अख्खं स्टेडियम स्तब्ध
वर्ल्ड कपमधील महत्त्वाच्या लढती डल्लासमध्ये होणार आहेत. या सामन्याच्यावेळी येताना चाहत्यांनी काळजी घ्यावी अशी सूचना देण्यात आली. तापमान ३२ अंश असले तरी ज्या मार्गावरून चालणार आहात त्याचे तपमान ५० अंश असू शकेल, असा इशारा देण्यात आला आहे. डल्लासमधील इशारा अमेरिकेच्या अन्य शहरातही लागू होऊ शकतो असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेतील अनेक स्टेडियम मेट्रो स्टेशन, रेल्वे स्थानकांपासून काहीशी दूर आहेत. त्यातच सुरक्षेमुळे पार्किंगपासूनही बरेच चालावे लागते.
FIFA World Cup 2026 : 1934मध्ये वर्ल्ड कपला पहिल्यांदा पात्र, 92 वर्षांनी इजिप्तचा पहिला विजय, कोण ठरला हिरो?
हा डांबरी मार्ग उन्हामुळे चांगलाच तापलेला असेल, तसेच सुरक्षा तपासणीची यंत्रणा धातूची आहे. त्याचबरोबर अनेक मार्गावर शेड नाही. त्यामुळे तो मार्ग तापलेला असेल. त्याचे तपमान हवामान विषयक संकेतस्थळे तसेच अॅप देत नाहीत. या तापलेल्या मार्गावर चालताना होणारा परिणाम चटकन लक्षात येत नाही. अमेरिकेतील डल्लाससारखी शहरे काँक्रिटची जणू जंगले झाली आहेत. त्यामुळे या शहरात उन्हाळा जास्त जाणवतो. त्यातही दुपारी दोन ते संध्याकाळी सात या कालावधीत दिर्घ चालावे लागल्यास त्याचा त्रास होतो. वर्ल्ड कपमधील अनेक सामन्यांच्यावेळी नेमक्या याच कालावधीत प्रेक्षकांना स्टेडियमकडे जावे लागते.
FIFA World Cup 2026 : जर्मनीला पराभूत केल्यावर इक्वेडोरच्या अध्यक्षांकडून राष्ट्रीय सुटी जाहीर
चार्टर विमान रद्द
दोन वेळचे विजेते उरुग्वे वर्ल्ड कपच्या गटसाखळीतच बाद झाले. त्यामुळे या संघाच्या प्रवासासाठी आरक्षित असलेले चार्टर विमान रद्द करण्यात आले आहे. खेळाडूंसाठी आता व्यावसायिक विमानांच्या तिकीटाचे आरक्षण करण्यात येत आहे. त्यातच संघातील खेळाडू आणि सहाय्यक यांच्यातील वादंग उघड झाल्यामुळे उरुग्वे फुटबॉल महासंघ संतप्त झाला आहे. त्यामुळे त्यांनी परतीच्या प्रवासासाठी आरक्षित केलेले चार्टर विमान रद्द केले आहे.

