Headlines

फिरकीपटूंनी वाचवलं, पण श्रीलंकेनंही लावली ताकद! दबावातल्या टीम इंडियाला दुसऱ्या दिवसासाठी आव्हान काय?


मुंबई : श्रीलंका दौऱ्याची सुरुवात भारतीय संघासाठी फारशी समाधानकारक ठरलेली नाही. श्रीलंका इलेव्हनविरुद्ध सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी यजमान फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. दिवसअखेर श्रीलंका इलेव्हनने ८ बाद ३६३ धावांचा डोंगर उभारला. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिल या सामन्यात खेळत नसल्याने केएल राहुलने या सामन्यात आज भारतीय संघाचे नेतृत्व केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका इलेव्हनला निशान मदुष्का आणि रविंदू रसंथा यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २०.४ षटकांत ११० धावांची भागीदारी केली. निशानने ६५ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६६ धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने पसिंदू सुरियाबंदाराला ३५ धावांवर बाद केले. रसंथानेही ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

Maharashtra TimesJohn Turner Retirement : दोन वर्षांपूर्वीच पदार्पण केलेल्या 25 वर्षीय जॉन टर्नरचा क्रिकेटला अलविदा! कठोर निर्णयामागचे कारण काय?

मधल्या फळीत पवन रत्नायकेने ३९, अहान विक्रमसिंघेने ३१ आणि कर्णधार सोनल दिनुषाने अर्धशतक झळकावत डाव सावरला. सोनलने ७१ चेंडूत ५२ धावा करत संघाला भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवले. रमेश मेंडिसनेही ३२ धावांचे योगदान दिले.

भारतीय गोलंदाजांचा दिवस मात्र निराशाजनक ठरला. तब्बल ९० षटकांत भारताने सात गोलंदाज वापरले, पण पाच गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट चारपेक्षा जास्त राहिला. फिरकीपटू रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर गुरनूर ब्रारला एक विकेट मिळाले.

Maharashtra TimesSakshi Chaudhary : राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सर साक्षी चौधरीने सुवर्ण जिंकलं! भारतात परतताच विराट कोहलीचे मानले आभार, कारण काय?

असे असतानाच, भारताच्या वेगवान गोलंदाजांना अपेक्षित प्रभाव पाडता आला नाही. श्रीलंकेच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे मिश्रण करत भारतीय गोलंदाजांना सातत्याने दबावाखाली ठेवले. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या भारतीय फलंदाज कसा खेळ करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा सराव सामना भारतासाठी स्थानिक खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी गोलंदाजांसह संपूर्ण संघाला आपल्या उणिवा दूर करण्याची ही शेवटची मोठी संधी असेल.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत