Headlines

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वित्झर्लंडची सरशी


कोलंबियावर 4-3 ने मात, स्वीस खेळाडू रुबेन वर्गासने निर्णायक पेनल्टीचे केले गोलमध्ये रुपांतर

वृत्तसंस्था, व्हँकुव्हर, ब्रिटिश कोलंबिया : फारशी आक्रमकता किंवा नाट्यामय घडामोडी नसलेल्या सामन्यात, स्विस संघाने कोलंबियाविरुद्ध आणि त्यांच्या उत्साही चाहत्यांसमोर संयमाने खेळ केला. सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये ऊबेन वर्गासने निर्णायक पेनल्टी गोलमध्ये रूपांतरित केली आणि स्वित्झर्लंडने कोलंबियाचा 4-3 असा पराभव करत विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

सोमवारी सरावादरम्यान दुखापत झालेला तऊण मिडफील्डर जोहान मंझांबी संघात नसल्यामुळे स्विस संघाला काहीशा अडचणींचा सामना करावा लागला. जर्मन क्लब ‘फ्रायबर्ग’कडून खेळणारा 20 वर्षीय मिडफील्डर मंझांबीने या विश्वचषकात तीन गोल केले आहेत आणि तो स्पर्धेतील एक उदयोन्मुख तारा ठरला आहे. या सामन्यात स्विस संघाला लुका जाक्वेझ आणि मिडफील्डर मिशेल एबिशर यांच्या अनुपस्थितीचाही सामना करावा लागला. विश्वचषकात दोन गोल करणारा वर्गास देखील सोमवारी सरावातून लवकर बाहेर पडला होता, परंतु मुख्य वेळेच्या शेवटी ‘स्टॉपेज टाइम’मध्ये तो मैदानात उतरला.

शूटआउटमध्ये कोलंबियाचा बचावपटू डेव्हिन्सन सांचेझ याचा पेनल्टीचा प्रयत्न क्रॉसबारला लागला, तर स्वित्झर्लंडचा गोलरक्षक ग्रेगोर कोबेलने कुचो हर्नांडेझचा प्रयत्न रोखला. फिफाचे अध्यक्ष आणि स्विस नागरिक असलेले जियानी इन्फँटिनो हे देखील ‘बीसी प्लेस’ स्टेडियमवर उपस्थित होते. हा स्टेडियम 52,497 प्रेक्षकांच्या पूर्ण क्षमतेने भरला होता आणि कोलंबियाच्या समर्थनासाठी बहुतांश प्रेक्षक पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये होते. कोलंबियाला 21 व्या मिनिटाला पहिली चांगली संधी मिळाली, जेव्हा गुस्तावो पुएर्टाने दुरून मारलेला फटका गोलरक्षक कोबेलने अडवून बाहेर काढला.

स्विस संघाला 30 व्या मिनिटाला उत्तम संधी मिळाली. यावेळी फॅबियन रिडरने गोलरक्षक कामिलो वर्गासच्या दिशेने जोरदार फटका मारला होता, जो वर्गासने ‘पंच’ करून खाली पाडला. काही मिनिटांनंतर डॅन एनडोयेचा आणखी एक प्रयत्न वर्गासने रोखून धरला. 52 व्या मिनिटाला स्विस संघाला ’फ्री-किक’ मिळाली होती. परंतु रिडरचा वळण घेतलेला फटका बचावपटूंच्या भिंतीवरून जाऊन गोलजाळीच्या बाजूच्या भागाला लागला. अतिरिक्त वेळेच्या पहिल्या सत्रात कोलंबियाने स्वीस गोलरक्षक कोबेलवर दबाव निर्माण केला असताना जॉन लुकुमीचा हेडर गोलपोस्टच्या वरच्या आडव्या दांड्याला लागून परत आला.

स्वित्झर्लंडसमोर आता आव्हान अर्जेंटिनाचे

शनिवारी मिसुरीमधील कॅन्सस सिटी येथील अॅरोहेड स्टेडियमवर स्वित्झर्लंडचा सामना गतविजेत्या अर्जेंटिनाशी होईल. अर्जेंटिनाने याच दिवशी आधी झालेल्या सामन्यात इजिप्तचा 3-2 असा पराभव केला. कोलंबिया व स्वित्झर्लंड या भिन्न शैली असलेल्या दोन संघांमध्ये चुरशीची लढत झाली. स्विस संघाने अधिक शिस्तबद्ध आणि पद्धतशीर खेळ केला, तर कोलंबियाचा खेळ आक्रमक आणि शारीरिक ताकदीवर आधारित होता. चेंडूवरील नियंत्रणाच्या बाबतीत स्विस संघाचे पारडे थोडे जड होते.

1954 नंतर प्रथमच स्वित्झर्लंड उपांत्यपूर्व फेरीत

1954 मध्ये विश्वचषकाचे यजमानपद भूषवल्यानंतर स्वित्झर्लंडला कधीही उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नव्हती. स्विस संघाने मागील तीन विश्वचषकांमध्ये 16 संघांच्या फेरीपर्यंत मजल मारली होती, परंतु 32 संघांच्या स्पर्धेत त्यांना पुढील फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले होते. दुसरीकडे, कोलंबियाला 2022 च्या मागील विश्वचषकासाठी पात्र ठरता आले नव्हते. त्यांनी 2014 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांनी 16 संघांच्या फेरीमध्ये उऊग्वेचा पराभव केला होता, परंतु त्यानंतर यजमान देशाकडून त्यांना 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत