Headlines

पिंपळगाव पेठ:कॉटन थेडर मशीनमुळे कापूस उत्पादन प्रक्रिया सुलभ होणार




कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने धानोरा येथील वरुणिका फार्मर प्रोड्युसर कंपनीला कॉटन थेडर मशीन प्रदान करण्यात आले. या अत्याधुनिक यंत्रामुळे परिसरातील कापूस उत्पादन व प्रक्रियेची कामे अधिक सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. वरुणिका फार्मर प्रोड्युसर कंपनीशी परिसरातील मोठ्या संख्येने कापूस उत्पादक शेतकरी जोडलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने कापसावर प्रक्रिया करताना शेतकऱ्यांना वेळ, मोठा खर्च आणि जास्त मनुष्यबळ लागते. मात्र, सीसीआयकडून मिळालेल्या या मशीनमुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचणार असून प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. या कार्यक्रमाला भारतीय कापूस महामंडळाचे महाप्रबंधक अर्जुन दवे, सहाय्यक महाप्रबंधक अवधेश कुमार, हर्षदीप सपकाळे आणि केंद्रप्रमुख नरेंद्र देसले यांची प्रमुख उपस्थिती होती. वरुणिका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने अजिंठ्याचे माजी सरपंच अब्दुल अजिज यांनी उपस्थितांचा सत्कार केला. कार्यक्रमास कंपनीचे संचालक रवींद्र काकडे व अजिनाथ काकडे यांचीही उपस्थिती होती.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत