Headlines

पाकिस्तान श्रीलंका आणि इंग्लंडचे वेळापत्रक जाहिर


तीन संघांमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिका होणार

वृत्तसंस्था/ कराची,

पाकिस्तान 9 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत श्रीलंका आणि इंग्लंडचे यजमानपद भूषवणार असून, या तीन संघांमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकाही होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी जाहीर केले की, श्रीलंका आपल्या दौऱ्याची सुरुवात 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 एकेरी मालिकेने करेल. त्यानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी सामील होईल, जी 18 ते 31 ऑक्टोबर दरम्यान रावळपिंडी आणि लाहोर येथे खेळवली जाईल. तिरंगी मालिकेनंतर श्रीलंका संघ पाकिस्तानमध्येच थांबेल आणि यजमानांविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यापूर्वी 4 नोव्हेंबरपासून इस्लामाबादमध्ये तीन दिवसीय सामना खेळेल. या कसोटी सामन्यांचा समावेश आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025-27 च्या चक्रात असेल. पहिली कसोटी 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाईल, तर दुसरी कसोटी 17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवली जाईल.मागिल वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर, सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्रात मायदेशातील ही पाकिस्तानची दुसरी कसोटी मालिका असेल. आगामी एकदिवसीय तिरंगी मालिका देखील पाकिस्तानची गेल्या काही वर्षांतील दुसरी मालिका असेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी, पाकिस्तानने मागिल फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवत एकदिवसीय तिरंगी मालिका खेळवली होती. श्रीलंकेचा संघ 4 ऑक्टोबर रोजी टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये दाखल होईल.

पाकिस्तानचा श्रीलंका दौरा

9 ऑक्टोबर: पहिला टी-20, रावळपिंडी; 11 ऑक्टोबर: दुसरी टी-20, रावळपिंडी; 13 ऑक्टोबर: तिसरा टी-20, रावळपिंडी.4-6 नोव्हेंबर: तीन दिवसीय सामना,इस्लामाबाद. 9-13 नोव्हेंबर: पहिली कसोटी, रावळपिंडी; 17-21 नोव्हेंबर: दुसरी कसोटी, लाहोर.

एकदिवसीय तिरंगी मालिका

18 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, रावळपिंडी; 20 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, रावळपिंडी; 22 ऑक्टोबर: श्रीलंका विरुद्ध इंग्लंड रावळपिंडी; 25 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर; 27 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, लाहोर; 29 ऑक्टोबर: श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, लाहोर; 31 ऑक्टोबर: अंतिम सामना, लाहोर.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत