Headlines

‘पहिल्या विजयाला तुक्का बोलल्यावर खेळाडूंना मी एकच गोष्ट सांगून ठेवलेली’; भारताला हरवल्यावर आयर्लंडच्या कर्णधाराचा मोठा खुलासा


IND vs IRE News : भारताला आयर्लंडने सलग दोन सामन्यात पराभूत करत मालिका २-० ने खिशात घातली. पहिला विजय मिळवल्यावर सर्वांनी तुक्का लागल्याचं म्हटल्यावर कॅप्टन लॉर्कन टकर याने संघातील खेळाडूंना काय सांगितलं होतं जाणून घ्या.

IND vs IRE
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : टी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला घरच्या मैदानावर आयर्लंडने गुंडाळलं. दुसऱ्या टी-२० सामन्यात १ धावेने भारताला पराभवाचा सामना करायला लागला. या सामन्यामध्ये भारताने आयर्लंड संघाला २० ओव्हरमध्ये १५४-८ धावांवर रोखलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ सहज मात करत मालिका बरोबरीत सोडवेल असे वाटत होते. पण तसे काही झाली नाही. आयर्लंडच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा जिद्द आणि चिकाटीने खेळ करत भारताला १५३-९ वर थांबवत मालिका खिशात घातली. भारतीय संघाला इतिहासात पहिल्यांदाच पराभूत करत मालिका जिंकली. आयर्लंड संघाचा कर्णधार लॉर्कन टकर याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विश्वासच बसत नाही, हे अविश्वसनीय आहे. मी खेळाडूंना सांगितले होते की, जगाला दाखवून देऊत की तो विजय केवळ योगायोग नव्हता, तर आपण पुन्हा तशी कामगिरी करू शकतो आणि ते करून दाखवले. पहिला विजय मिळवल्यावर आम्ही मोठ्या उत्साहात होतो, पण संघातील खेळाडूंना जमिनीवर राहा असा सल्ला दिलेला. रिकव्हरी केली आणि त्याच जिद्दीने मैदानात उतरलो. युवा खेळाडूंच्या नावावर फार सामने नाहीत, पण त्यांनी दाखवून दिले की ते पडद्यामागे मेहनत करतात. मोठ्या मंचावरही ते येऊन कामगिरी करू शकतात आणि जगातील सर्वोत्तम संघाला हरवू शकतात. अनेकदा असं वाटतं की आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सावलीत खेळतो, पण आता आम्ही पहिल्या पानावर असू, असं लॉर्कन टकर म्हणाला.
Maharashtra TimesSunil Gavaskar : वैभव सूर्यवंशीला गंभीरने संधी दिलीच नाही! आयर्लंडविरुद्ध त्याला का खेळवायला पाहिजे होतं? सुनील गावसकर म्हणाले…
२०११ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये इंग्लंडवर मिळवलेल्या विजयानंतरचा आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासातील हा सर्वात मोठा क्षण ठरला आहे. भारतासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्याने आयर्लंडचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताचा हा पराभव झाल्यामुळे टी-२० क्रिकेटमधील सलग १६ मालिका जिंकण्याच्या विक्रमाला आता ब्रेक लागलाय. २०२३ मधील पासून भारतीय संघाने एकही टी-२० सामना गमावला नव्हता.
Maharashtra TimesIND W vs AUS W : वर्ल्ड कपमधून भारताचं पॅकअप, नक्की कुठे चुकलं? कॅप्टन हरमनप्रीत कौरचे मोठे विधान; हे खूप दिवसांपासून सुरू…
दरम्यान, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयर्लंडने आतापर्यंत तीन सामने १ धावेने जिंकले आहेत. यात २०१९ मध्ये डब्लिन येथे स्कॉटलंडविरुद्ध, २०२४मध्ये वूरबर्ग येथे नेदरलँड्सविरुद्ध आणि २०२६ मध्ये बेलफास्ट येथे भारताविरुद्ध मिळवलेला विजय समाविष्ट आहे. टी-२० मध्ये भारतालाही तीन वेळा १ धावेने पराभव स्वीकारावा लागला आहे. २०१२ मध्ये चेन्नई येथे न्यूझीलंडविरुद्ध, २०१६ मध्ये लॉडरहिल येथे वेस्ट इंडिजविरुद्ध आणि २०२६ मध्ये बेलफास्ट येथे आयर्लंडविरुद्ध भारताचा १ धावेने पराभव झाला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा