नीट पेपरफुटी प्रकरणात बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे सीबीआयच्या ताब्यात – in the neet paper leak case, pediatric specialist dr. manoj shirure is in cbi custody.
नीट पेपरफुटी प्रकरणात बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे सीबीआयच्या ताब्यात – in the neet paper leak case, pediatric specialist dr. manoj shirure is in cbi custody.
कथित नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात सीबीआयने आणखी एक मोठी कारवाई केली आहे.लातुरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना ताब्यात घेतलं आहे.डॉक्टर शिरुरे यांनी मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा संशय सीबीआयला होता.मंगळवारी रात्री सीबीआयने डॉ. शिररे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्बल तीन ते साडेतीन तास चौकशी केली.चौकशीनंतर त्यांन पुढील चौकशीसाठी काल पुणे येथे हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.पुण्यात झालेल्या चौकशीअंती डॉ. शिरूरे यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.