Headlines

नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघात- VIDEO:उड्डाणपुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; थरार कॅमेऱ्यात कैद




नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी परिसरात एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला. या घटनेचा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुलावरून थेट ट्रक खाली पडल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाचा ताबा सुटला अन् ट्रक खाली कोसळला मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर एमआयडीसी परिसरातील उड्डाणपुलावरून हा ट्रक जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकवरून चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. ताबा सुटलेला हा अवजड ट्रक पुलाच्या कठड्यांना धडकून थेट पुलावरून खाली जमिनीवर जाऊन आदळला. अपघात इतका भीषण होता की ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात एकच गोंधळ, पोलिसांची घटनास्थळी धाव पुलावरून भलामोठा ट्रक अचानक खाली कोसळल्याने मोठा आवाज झाला. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली, तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. या अपघातात ट्रकचालक किती जखमी झाला आहे किंवा इतर कोणती जीवितहानी झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस पुढील तपास करत असून परिसरातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत