Headlines

नाद केला पण वाया नाही गेला! डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने बुमराहला मागे टाकत रचला इतिहास


Prince Yadav News : भारत आणि आयर्लंडमधील दुसऱ्या सामन्यामध्ये डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने दमदार कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने तीन विकेट नावावर केल्या आहेत.

Prince Yadav
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील दुसरा टी-२० सामना पार पडत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आयर्लंड संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १५४-८ धावा केल्या होत्या. या सामन्यामध्ये हॅरी टेक्टर याने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर बेंजामिन कॅलिट्झने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून पदार्पणवीर प्रिन्स यादव याने सर्वाधिक तीन विकेट घेत जसप्रीत बुमराह याचा विक्रम मोडला आहे.

भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करण्याच्या यादीमध्ये प्रिन्स यादव याचा समावेश झाला आहे. आज प्रिन्स यादव याने ४ ओव्हरमध्ये २२ धावा देत ३ विकेट नावावर केल्या आहेत. आजच्या सामन्यात सर्वात कमी सरासरीने धावा दिल्या आहेत. पदार्पण सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करताना प्रिन्सने जसप्रीतला मागे टाकले आहे. बुमराहने २०१६ साली पदार्पण सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध २३/३ विकेट घेतल्या होत्या. आज प्रिन्सने पहिला सामना खेळताना कोणताही दबाव घेतला नाही.
Maharashtra TimesIND vs IRE Playing 11 : भारताचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, टीममध्ये 2 मोठे बदल; वैभवला संधी नाहीच

टी-२० पदार्पण सामन्यात सर्वोत्तम कामगिरी

  • ४/१० – बरिंदर सरन वि. झिम्बाब्वे (हरारे, २०१६)
  • ४/२२ – शिवम मावी वि. श्रीलंका (वानखेडे, २०२३)
  • ३/९ – भुवनेश्वर कुमार वि. पाकिस्तान (बेंगळुरू, २०१२)
  • ३/१७ – नवदीप सैनी वि. वेस्ट इंडिज (लॉडरहिल, २०१९)
  • ३/२२ – प्रिन्स यादव वि. आयर्लंड (बेलफास्ट, २०२६)
  • ३/२३ – जसप्रीत बुमराह वि. ऑस्ट्रेलिया (ॲडलेड, २०१६)

भारतीय फलंदाज मागील सामन्यामध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. आजच्या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांनी परीक्षा असणार आहे. आज भारताच्या सलामीच्या फलंदाजांना दमदार सुरूवात करून द्यावी लागणार आहे.
Maharashtra TimesIND W vs AUS W Playing 11 : सेमीफायनलसाठी निर्णायक लढत; भारताने टॉस जिंकत फलंदाजी निवडली, टीममध्ये एक मोठा बदल
आयर्लंड (प्लेइंग 11): टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (C/WK), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रे, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलर्ड

भारत (प्लेइंग 11): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा