Headlines

सगुण-निर्गुण: समर्पण – bharti sudame sagun nirgun special article on dedication


-भारती सुदामे

चरणोंपर अर्पित है, इसको चाहो तो स्वीकार करो, यह तो वस्तु तुम्हारीही है, ठुकरा दो या प्यार करो।’ सुभद्राकुमारी चौहान यांच्या या ओळी. ईश्वराची पूजा करायला धूप, दीप, नैवेद्य अशा बाह्य उपचारांची गरज नसते. प्रेमानं ओथंबलेलं हृदयही पुरेसं आहे. ते त्याला समर्पित केलं की झालं. समर्पण ही वृत्ती आहे. ही ईश्वराशिवायही अनेक ठिकाणी असते. त्यातलं महत्त्वाचं समर्पण हे मातृभूमीसाठी केलेलं समर्पण. सामान्यपणे समर्पणाचा संबंध त्यागाशी जोडला जातो. त्यातून कधी – कधी ‘मी त्याग केला’ असा सात्विक का होईना, पण एक सूक्ष्मसा अहंकार , त्याग करणाराच्या मनात उत्पन्न होतो.

अहंकार आला की समर्पण संपलंच. समर्पणाचा अर्थ स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी पूर्णपणे देऊन टाकणं. एकदा समर्पण केलं की कुठल्याही प्रकारे निवड वा तक्रार करण्याचा अधिकार नसतो. जेव्हा पराजित सैन्य जिंकलेल्या देशाच्या सत्तेपुढे आत्मसमर्पण करतं, तेव्हा त्या सैन्याला आपले सर्व निर्णय ज्यांच्यापुढे समर्पण केलं आहे त्या सत्तेच्या मताप्रमाणे घ्यावे लागतात, अनिवार्यपणे. चोर दरोडेखोर – डाकू, असे समाजकंटक देशाच्या शासनापुढे आत्मसमर्पण करतात, तेव्हा त्यांनाही हाच नियम लागू होतो.

भौतिक जगतातलं समर्पण आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं समर्पण यांत खूप फरक आहे. भौतिकातलं समर्पण बरेचदा नाईलाजानं, जबरदस्तीनं किंवा भीतीपोटी केलेलं असू शकतं. काही वेळा पश्चात्ताप झाला, मनपरिवर्तन झालं किंवा आपली चूक समजल्यामुळे ती सुधारावी म्हणूनही असू शकतं. अशावेळी संधी मिळताच मन पुन्हा बंड करून उठू शकतं.

आध्यात्मिक समर्पणात मात्र यापैकी काहीही नसतं. असते ती फक्त मी तुझा आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे हे माझ्यापेक्षा जास्त तुला माहिती आहे, मी स्वतःला तुझ्यावर सोपवलं आहे हा विश्वास आणि माझ्यासाठी जे निर्णय घ्यायचे ते तूच घे, ही भावना. मीराबाईंइतकं समर्पणाचं श्रेष्ठ उदाहरण दुसरं नाही. ‘जहाँ बैठावै तित ही बैठूं, बेचै तो बिक जाऊं।’

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत