Headlines

नादखुळा! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन तोडफोड फलंदाजांची चर्चा, 28 आणि 34 चेंडूत मिळून 159 धावा; पाहा नेमके कोण?


Delhi Premier League : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सेंट्रल दिल्ली किंग्सने न्यू दिल्ली टायगर्सवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यावेळी दोघांनी वादळी खेळी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

Feature photos - 2026-08-12T102536
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. काल झालेल्या रोमांचक सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्सने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यू दिल्ली टायगर्सचा तब्बल ९ विकेट्स राखून धुव्वा उडवला. पावसामुळे व्यत्यय आल्याने हा सामना निर्धारित २० षटकांऐवजी १८-१८ षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला.

न्यू दिल्ली टायगर्सने दिले १८५ धावांचे आव्हान

प्रथम फलंदाजी करताना न्यू दिल्ली टायगर्सने १८ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावांचा मजबूत डोंगर उभा केला. कर्णधार हिम्मत सिंहने आक्रमक सुरुवात करत अवघ्या २१ चेंडूत ४६ धावा कुटल्या आणि संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्याला केशव दलाल सिंहने ३१ चेंडूत ३९ धावा करत चांगली साथ दिली. तर, शेवटच्या षटकांमध्ये मनीष सहरावतने वेगाने धावा गोळा करत १९ चेंडूत ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Maharashtra TimesCristiano Ronaldo wedding : रोनाल्डोचं जगभरातल्या चाहत्यांना मध्यरात्री मोठं सरप्राईज, दीर्घकालीन प्रेयसीसोबत विवाह! कुठे आणि कसा पार पडला लग्नसोहळा?
न्यू दिल्ली टायगर्सने एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती, पण सेंट्रल दिल्ली किंग्सच्या गोलंदाजांनी मात्र ठराविक अंतराने बळी घेत त्यांच्या धावगतीला लगाम घातला. सेंट्रल दिल्लीकडून गवनीश खुरानाने अत्यंत प्रभावी गोलंदाजी करत आपल्या ४ षटकांत ३६ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी टिपले.

यश धुल आणि सिद्धार्थचा धमाका

विजयासाठी मिळालेल्या १८६ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सेंट्रल दिल्ली किंग्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अंडर-१९ वर्ल्ड कप विजेता कर्णधार यश धुल आणि सिद्धार्थ जून यांनी न्यू दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १२६ धावांची भक्कम भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. यश धुलने तुफानी फलंदाजी करत अवघ्या २८ चेंडूत ७६ धावा ठोकल्या. त्याच्या या स्फोटक खेळीत ६ चौकार आणि ८ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. त्याच्या आक्रमक शैलीमुळे न्यू दिल्ली टायगर्सचे गोलंदाज अक्षरशः दबावाखाली आले.

Maharashtra TimesIND vs AFG T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानमधील टी-२० मालिकेचे शेड्यूल जाहीर, वैभव सूर्यवंशीचा कहर पाहायला मिळणार? केव्हा जाणून घ्या

सेंट्रल दिल्लीचा एकतर्फी विजय

यश धुल बाद झाल्यानंतरही २० वर्षीय सिद्धार्थ जूनने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. त्याने युगलसैनीच्या साथीने फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली आणि संघाचा विजय निश्चित केला. हातात विकेट्स असल्याने आणि आवश्यक रनरेट नियंत्रणात असल्याने सेंट्रल दिल्ली किंग्सने हे आव्हान अतिशय सहज पार करत ९ विकेट्स राखून शानदार विजय नोंदवला. सिद्धार्थ जूनने शेवटपर्यंत नाबाद राहत केवळ ३४ चेंडूत ८३ धावांची मॅचविनिंग खेळी केली आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.