Headlines

नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना:साचलेल्या पाण्यात पसरला हायव्होल्टेज करंट, दोन कॉलेज तरुणी गंभीर जखमी




नवी मुंबईतील नेरूळमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एल.पी. ब्रिजसमोरील बिकानेर स्वीट्स परिसरात एका विद्युत वाहिनीमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरला. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या विद्युतप्रवाहाच्या कचाट्यात सापडल्या आणि जागेवरच कोसळल्या. दोघीही क्षणात रस्त्यावरील पाण्यात बेशुद्ध नेरूळच्या एल.पी. ब्रिजखाली मुसळधार पावसामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. याच पाण्यात अचानक विजेचा करंट पसरल्याने तिथून पायी जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणींना विजेचा तीव्र झटका बसला. हा झटका इतका भीषण होता की, दोघीही क्षणात रस्त्यावरील पाण्यात बेशुद्ध होऊन पडल्या. हा प्रकार पाहताच परिसरात एकच पळापळ आणि खळबळ उडाली.
नागरिकांची धावपळ घटनेचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींनी आणि स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखून दोन्ही विद्यार्थिनींना पाण्यातून बाहेर काढले. दोघींचीही प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना तातडीने एका रिक्षात घालून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!:स्कूल बसवर मोठे झाड उन्मळून पडले, 4 विद्यार्थी जखमी; 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू दरम्यान, काल मंगळवारी मुंबईतील चेंबूर परिसरात अत्यंत भीषण दुर्घटना घडली. ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून कोसळले. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, ४ शाळकरी मुले गंभीर जखमी झाली. प्राथमिक माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर ही खाजगी स्कूल बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी चेंबूरच्या ११ नंबर रोडवरून जात होती. याच दरम्यान रस्त्याशेजारी असलेले एक जुने आणि अवाढव्य झाड अचानक धावत्या बसवर उन्मळून पडले. झाडाच्या मोठमोठ्या आणि जड फांद्या थेट बसच्या छतावर आदळल्या. यामुळे बसचा समोरील आणि मधला हिस्सा मोठ्या प्रमाणावर चपला गेला. झाड कोसळताच बसच्या आत निष्पाप चिमुरड्यांचा एकच आक्रोश आणि किंचाळ्या ऐकायला आल्या. ४ बालक जखमी, १ विद्यार्थिनीचा मृत्यू अपघातावेळी बसमध्ये एकूण १२ विद्यार्थी प्रवास करत होते. झाड कोसळल्यानंतर बसचे मोठे नुकसान झाले आणि काही विद्यार्थी आत अडकून पडले. मात्र, मदत पथके पोहोचण्यापूर्वीच बसचे चालक, वाहक आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे बचावकार्य पूर्ण करून सर्व १२ विद्यार्थ्यांना बाहेर काढले. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत