![]()
तुम्हालाही असं वाटतं का की, अनेकदा तुमच्याशीबोलताना समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा स्वतःच्या फोनकडेजास्त बघत असते? घरातही एखादी व्यक्ती तुमच्याशीबोलता बोलता मोबाइल फोनमध्ये व्यग्र होऊन जाते.यासाठी एक नवा शब्द शोधून काढला आहे- ‘फबिंग’. हाशब्द फोन आणि स्नबिंग (दुर्लक्ष करणे) यातून तयार झालाआहे. सामाजिक नाती व संवादावर याचा खूप खोलपरिणाम होत आहे. शरीराने हजर असूनही भावनिकदृष्ट्या दूर राहण्याची हीप्रवृत्ती काय सांगते? स्क्रीनवर फिरणारी बोटे आणिस्क्रीनमध्ये बुडालेले डोळे यावर विश्वासच ठेवू शकतनाहीत की, त्यांच्या जवळ दुसरं कोणीतरी बसलं आहे. तेत्यांच्याशी बोलत आहेत व त्यांना त्यांच्यावर लक्ष देण्याचीगरज आहे. तुमच्यासमोरच कुणाचे तरी फोनमध्ये हरवूनजाणे किंवा सतत फोन बघत राहणे यातून हेच दिसते की, हेछोटेसे यंत्र आता संवाद व भेटीगाठींवर वरचढ ठरत आहे. फोन आणि एआयने मिळून आपले जीवन पूर्णपणे बदलूनटाकले आहे. जेव्हा कोणी बोलत असेल, तेव्हा त्या व्यक्तीचेबोलणे लक्ष देऊन आणि आदराने ऐकणे हा एक मूलभूतशिष्टाचार आहे, असे आपल्याला शिकवले जाते. पण हेहीखरे आहे की, ‘फबिंग’च्या काळात आपले हे वागणेकोणाला तरी दुखावू शकते, असा विचार कोणीच करतनाही. आणि जेव्हा ही सवय घरापासून ते संस्थांपर्यंतसामान्य होते, तेव्हा समाजात व्यक्ती आणि त्याच्यानात्याच्या भावनिक पैलूवर खूप मोठा आघात होतो.‘फबिंग’ हे वस्तूकडे नव्हे तर व्यक्तीकडे दुर्लक्ष करूनत्याला एक ‘न्यू नॉर्मल’ सामाजिक व्यवहार बनवून टाकते. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी नक्कीचअसतात. नात्यांमधील संवाद हा त्या गोष्टींचाच एक भागअसतो. आपली गोष्ट सांगताना एखादी व्यक्ती त्यात पूर्णपणेहरवून जाते. तेव्हा समोरच्या व्यक्तीनेही आपल्या भावना वशब्दांना तितकेच महत्त्व द्यावे, अशी तिची इच्छा असते.तुम्हीही घरात अनुभवले असेल की, मुले अनेकदाआई-वडिलांचे बोलणे ऐकत असताना आपले बहुतांशलक्ष फोनवरील अशा कामात देतात, जे सहसा पूर्णपणेअनावश्यक असते, तर मग ‘फबिंग’ आपल्या भावनिकगोष्टींनाही निर्जीव बनवून टाकेल का? कदाचित हो.नुकताच एक अभ्यास झाला. त्यात वाचकांना सहा लघुकथादिल्या गेल्या. त्यातील तीन कथा माणसांनी लिहिल्या होत्याआणि तीन चॅटजीपीटीने बनवल्या होत्या. एआयच्यामाध्यमातून लिहिलेल्या कथांचा विषयही माणसांच्याकथांसारखाच होता, पण जेव्हा वाचकांना त्या कथांच्यारंजकतेच्या आधारावर रेटिंग द्यायला सांगितले, तेव्हाएआयने बनवलेल्या कथांना जास्त रेटिंग मिळाले. हा कलहेच सांगतो की, सामाजिक संवादात ‘फबिंग’ आल्यामुळेनाती आणि त्यांच्या कथांचा भावनिक पैलू कमकुवत झालाआहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, आपल्या पूर्वजांनी मानसरळ ठेवूनच संस्कृतीच्या विकासाची कथा पूर्ण केलीहोती, पण आपले दोन मोकळे हात आता पुन्हा बांधले गेलेआहेत आणि सरळ असलेली मान फोनकडे पाहताना पुन्हाखाली झुकली आहे. या चक्रात अडकून सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत गुलामबनलेल्या स्वतःला आणि इतरांनाही मुक्त करण्याचा प्रयत्नकरा. कोणी फोनमध्ये व्यग्र होऊन तुमच्याकडे दुर्लक्ष करतअसेल, तरीही त्यांच्याबद्दल कोणतीही ‘फबिंग’ची भावनामनात ठेवू नका. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहा.तरच घर, संस्थांमध्ये फोनच्या विळख्यातून मुक्त झालेलेडोळे, कान आणि मन माणुसकीला ‘फबिंग’च्या ग्रहणातूनवाचवतील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
Source link
नंदितेश निलय यांचा कॉलम:आता बोलायचे असेल तर फोन उचलू नका, तो एका बाजूला ठेवा
