Headlines

दोन तासांचा प्रवास 20 मिनिटांवर येणार, वर्सोवा-दहिसर-भाईंदर प्रकल्पाचे काम सुसाट


मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेकडून रस्त्याची महत्त्वाचे कामे केली जात आहे. त्यापैकीच वर्सोवा-दहीसर-भाईंदर कोस्टल रोडचे काम जोरात सुरु आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला तर मरीन ड्राईव्हवरुन थेट भाईंदरपर्यंत जाता येणार आहे.

Versova-Dahisar-Bhayandar Coastal Road
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईला जोडण्यासाठी काही महत्त्वकांक्षी प्रकल्प सध्या सुरु आहेत. यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे उत्तर किनारी भागाला सुरु असलेल्या वर्सोवा-दहिसर-भाईंदर या मार्गाला गती मिळाली आहे. या प्रकल्पामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या प्रकल्पामुळे अंधेरीतील वर्सोवा आणि ठाणे जिल्ह्याच्या भाईंदरपर्यंतचा प्रवास खूप कमी वेळाचा होणार आहे. विशेष म्हणजे सध्या वर्सोवा ते भाईंदर जाण्यासाठी रस्ते मार्गाने 2 तासांचा अवधी लागतो. पण वर्सोवा-दहिसर-भाईंदर या नव्या सागरी किनारी मार्गामुळे दोन तासांचा प्रवास हा 20 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे सर्वासामन्यांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचे काम पूर्ण

मुंबई महापालिकेने या प्रकल्पलाच्या कामाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम दक्षिण मुंबईत पूर्ण झाले आहे. मरीन ड्राईव्हपासून वरळीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. आता यानंतर उत्तर मुंबईतील किनारी रस्त्याच्या कामाला गती मिळताना दिसत आहे. वर्सोवा-दहिसर-भाईंदर अशा या मार्गाचे काम मुंबई महापालिकेकडून केले जात आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेकडूनच दहिसर-भाईंदर उन्नत मार्गाचे देखील जोरात सुरु आहे. मुंबई महापालिकेचे प्रकल्पाचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतंच या उन्नत मार्गाच्या कामाची पाहणी केली आहे.

वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम सुरु

मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्त्वकांक्षी आणि मोठा असा हा प्रकल्प आहे. खरंतर आंतरबदल आणि जोडरस्ते मिळून एकूण 60 किमीचे प्रकल्प आहे. यातून वर्सोवा आणि भाईंदर किनारा रस्त्याने जोडले जाणार आहेत. दरम्यान, वर्सोवा-दहिसर-भाईंदर प्रकल्पाचे कामे हे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केले जात आहेत. ए, बी, सी, डी, ई, एफ, दहिसर-भाईंदर जोडरस्ता (डीबीएलआर) अशा सात टप्प्यांमध्ये या रस्त्यांची कामे विभागली गेली आहेत.

प्रकल्पात कोणकोणते रस्ते, बोगदे बनवले जाणार?

या प्रकल्पाच्या माध्यमातून दुहेरी उन्नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ते, दोन केबलवर आधारीत पूल, चार बास्केट पूल, 15 मीटर व्यासाचे दोन जुळे बोगदे आणि 10 आंतरबदल उभारण्यात येणार आहेत. तसेच मालाड-चारकोप दरम्यान येथे 7.8 किमीचे जुळे बोगदे तयार केले जाणार आहे. त्यासाठी खोदकाम सुरु झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे.

रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर कनेक्टिविटी वाढणार

एकीकडे नरिमन पॉईंट-भाईंदर या प्रकल्पाचे काम सुरु आहे. नरिमन पॉईंट-वरळी दक्षिण सागरी किनारा मार्ग तयार झाला आहे. दुसरीकडे वांद्रे-वर्सोवा रस्त्याचे काम राज्य सरकारच्या प्राधिकरणाकडून सुरु आहे. तसेच वरळी-वांद्रे सेतू सर्वश्रूत आहे. सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाले तर नरिमन पॉईंटहून भाईंदरपर्यंत थेट समुद्र किनाऱ्यापासून रस्ते मार्गाने कमी वेळेत जाता येणार आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा