आरोपी जिम ट्रेनर इम्रान फरार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीच्या टिळक नगर परिसरात बुधवारी रात्री एका 21 वर्षीय मॉडेल मुस्कानची तिच्या घरात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात इम्रान नावाचा एक जिम ट्रेनर आरोपी आहे. तो त्या महिलेला काही काळापासून ओळखत होता. पोलिसांच्या सूत्रांनुसार, बुधवारी सायंकाळी मुस्कानचे कुटुंबीय बाहेर गेले असताना ती घरी एकटीच होती. आरोपीने येऊन तिच्यावर चाकूने हल्ला केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. पोलिसांनी जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासल्यानंतर आरोपी पळून जाताना दिसत आहे. घटनेनंतर तो घरात कसा पोहोचला आणि त्याने कोणता मार्ग निवडला, हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
