Headlines

PC Mustafa iD Fresh Food Success Story; सहावी नापास कसा झाला 4 हजार कोटींच्या कंपनीचा मालक? हमाल राहिलेल्या मुस्तफाची यशोगाथा एकदा वाचाच

PC Mustafa Success Story: इडली-डोसा पीठ बनवणाऱ्या iD फ्रेश फूड्स या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ, मुस्तफा पीसी, ने सहावीत नापास झाल्यावर शाळा सोडली. वडिलांसोबत काही रुपयांसाठी हमालीही केली पण, एका शिक्षकाने मुस्तफाच्या आयुष्याला नवीन वळण दिले.

PC Mustafa iD Fresh Foods Success Story
सहावी नापास कसा झाला 4 हजार कोटींच्या कंपनीचा मालक?
Success Story : आपल्या मेहनत आणि जिद्दीने आपलं नशीब लिहिणारी फार कमी लोक आहेत. आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप पैसा किंवा श्रीमंत वारसा हवा, असं तुम्हाला वाटत असेल तर आयडी फ्रेश फूडचे संस्थापक पीसी मुस्तफाचा जीवनप्रवास नक्कीच तुमचा विचार बदलेल. एका रोजंदारी मजुराच्या मुलापासून ते 4000 कोटींच्या कंपनीचे मालक बनण्यापर्यंत मुस्तफा यांचा प्रवास अश्रू, संघर्ष आणि अढळ ध्यासाची अशी गाथा आहे, जी कोणाच्याही डोळ्यात अश्रू आणेल.

दारिद्र्य, भूक अन् सहावीत नापास होण्याची वेदना

दारिद्र्य, भूक अन् सहावीत नापास होण्याची वेदना

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील चेन्नालोड या दुर्गम आणि मागासलेल्या गावात पी.सी. मुस्तफा यांचा जन्म झाला. मुस्तफाचे वडील कॉफीच्या मळ्यात हमाल म्हणून काम करायचे तर, आई कधीच शाळेत गेल्या नाही. मुस्तफा यांचे बालपण इतक्या भीषण दारिद्र्यात गेले की, त्यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी चांगले कपडे किंवा बूटही नव्हते.

शाळा सोडून हमाली केली

शाळा सोडून हमाली केली

मुस्तफा दररोज अनेक किलोमीटर चालून शाळेत जायचे. शाळेनंतर कुटुंबाचं पोट भरण्यासाठी वडिलांसोबत शेतमळ्यात काम करायचे. कामामुळे थकवा आणि भूक यांमुळे त्यांचा अभ्यास व्हायचा नाही परिणामी मुस्तफी सहावीत नापास झाले. त्यानंतर शाळा सोडून मुस्तफाने वडिलांसोबत पूर्णवेळ रोजंदारीवर काम सुरू केले.

एका शिक्षकाने आयुष्याला दिल नवीन वळण

एका शिक्षकाने आयुष्याला दिल नवीन वळण

मुस्तफाचे आयुष्य कदाचित मजूर म्हणून संपलं असतं पण, नशिबाने एकेदिवशी वेगळाच डाव साधला. शाळेतील शिक्षक, मॅथ्यू सर, यांनी मुस्तफाची सुप्त प्रतिभा ओळखली आणि मुस्तफाला सल्ला दिला, ज्याने त्यांना पुन्हा शाळेत जाण्यास प्रोत्साहित केले. आपल्या शिक्षकाच्या शब्दांनी मुस्तफाच्या मनावर खोलवर परिणाम केला. त्यानंतर, मजूर म्हणून काम करण्यासोबत मुस्तफा रात्रंदिवस अभ्यास करू लागला आणि सहावीत नापास झालेला मुस्तफा दहावीत संपूर्ण शाळेत प्रथम आला.

मजूर ते NIT अन् मग परदेश प्रवास

मजूर ते NIT अन् मग परदेश प्रवास

मग काय, 10 वी उत्तीर्ण झाल्यावर पुन्हा मागे वळून पाहिलं नाही आणि आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर कालिकत येथील प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. NIT मध्ये इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केल्यावर मुस्तफाला मोटोरोला आणि नंतर सिटीबँक यांसारख्या टॉप कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. एकेकाळी फाटक्या कपड्यांत फिरणारा मुलगा आता महिन्याला लाखो रुपये कमवू लागला होता.

भारतात परतल्यावर सुरू केले iD फ्रेश फू

भारतात परतल्यावर सुरू केले iD फ्रेश फू

पण मुस्तफाचे मन अजूनही भारतातच रमलेले. मायदेशात परत जाऊन आपल्यासारख्या गरीब लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता. 2003 मध्ये धाडसी निर्णय घेतला आणि परदेशातील गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून मुस्तफा भारतात आले. IIM बेंगळुरूमधून एमबीए पूर्ण आणि या दरम्यान 2005 मध्ये आपल्या चुलत भावांसोबत छोटा व्यवसाय सुरू केला. दक्षिण भारतातील लोक नाश्त्याला भरपूर इडली आणि डोसा खातात, पण बाजारात मिळणारे इडली आणि डोशाचे पीठ अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इथूनच त्यांना iD फ्रेश फूडची कल्पना सुचली.

छोट्याशा खोलीतून सुरू केला व्यवसाय

छोट्याशा खोलीतून सुरू केला व्यवसाय

आपल्या कल्पनेला सातत्यात उतरवत मुस्तफाने बेंगळुरूच्या इंदिरानगर परिसरातील 50 चौरस फुटांच्या छोट्याशा स्वयंपाकघरातून फक्त 2500 रुपयांपासून सुरुवात केली. या दरम्यान, दोन ग्राइंडर विकत घेतले आणि स्वतःच पीठ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला मुस्तफा आपल्या स्कूटरवरून स्वतःच दुकानांमध्ये बॅटर विकायला जायचे. पहिल्या दिवशी फक्त 10 पाकिटे विकली गेली पण, मुस्तफाने हार मानली नाही.

2500 रुपयांची गुंतवणूक अन् उभा झाला 681 कोटींचा व्यवसाय

2500 रुपयांची गुंतवणूक अन् उभा झाला 681 कोटींचा व्यवसाय

मुस्तफाचा प्रामाणिकपणा आणि निर्मळपणाने लोकांची मने जिंकली. हळूहळू, 10 पाकिटांपासून सुरुवात होऊन 100, मग 1000 पर्यंत वाढले आणि आज आयडी फ्रेश फूडचे दररोज लाखो किलो इडली-डोसा पीठ, मलबार पराठा आणि पनीर बाजारात विकले जाते. रेडी-टू-कूक फ्रेश फूड्समधील मजबूत बाजारातील मागणी आणि अपॅक्स पार्टनर्ससारख्या मोठ्या गुंतवणुकीमुळे समर्थित मूल्यांकनामुळे आयडी फ्रेश फूडचे मूल्य 4000 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. iD फ्रेश फूड्स आज भारतात तसेच दुबई आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये कार्यरत असून हजारो तरुणांना रोजगार देते, ज्यापैकी बहुतेक ग्रामीण भागातील आहेत.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा