Headlines

दहा वर्षांनी सुटला प्रश्न ;अखेर शेतरस्ता झाला खुला, टाळकी कोलते येथे महसूल प्रशासनाची कारवाई


Chhatrapati Sambhajinagar News: फुलंब्री तालुक्यातील टाळकी कोलते येथे गेली दहा वर्ष शेतरस्ता खुला करण्यावरून वाद सुरू होता. अखेर दहा वर्षांनी हा शेतरस्ता खुला करण्यात आला.

शेतरस्ता
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी , फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील अनेक वर्षांपासून बंद असलेला शेतरस्ता अखेर मोकळा करण्यात आला आहे. सुमारे दोन किलोमीटर लांबीचा आणि २० फूट रुंदीचा हा शेतरस्ता अखेर महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने मोकळा करण्यात आला, अशी माहिती महसूल विभागातर्फे देण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील सुमारे ७० ते ८० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या कारवाईमुळे या शेतरस्त्याचा जवळपास दहा वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.

शेतरस्ता मोकळा करून देण्याची मागणी

टाकळी कोलते येथील भगवान पंडित कोलते आणि इतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय फुलंब्री येथे अर्ज दाखल करून गावातील गट क्रमांक ३५८ पर्यंत जाणारा जुना शेतरस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सुनावणी होऊन तहसीलदारांनी संबंधित पक्षांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग कायमस्वरूपी खुला

फुलंब्रीच्या तहसीलदांनी दिलेल्या आदेशानुसारमहसूल विभागानेप्रत्यक्ष जागेवर जाऊन शेतरस्ता मोकळा करण्याची कारवाई केली. तहसीलदार योगिता खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रकाश गायकवाड,मंडळ अधिकारी प्रशांत पानसरे, ग्राममहसूल अधिकारी बहुरे तसेच पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत नकाशानुसार रस्त्यावरील अतिक्रमण हटवून शेतरस्ता मोकळा करण्यात आला. या कारवाईमुळे टाकळी कोलते परिसरातील सुमारे ७० ते ८० शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग कायमस्वरूपी खुला झाला असून शेतीची कामे, पिकांची वाहतूक तसेच कृषी यंत्रसामग्रीची ने-आण आता सुलभ होणार आहे.

Maharashtra TimesNCMC Card: एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी प्रवाशांची कसरत, महामंडळाकडून नागरिकांना दिलासा; नोंदणीसाठी एका महिन्याची मुदतवाढ

तहसील प्रशासनाचे आभार

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर महसूल प्रशासनाने वेळेत कारवाई केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून तहसील प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News: खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त;जीवनवीहिनी असलेल्या जालना रोडवर वाहने चालविणे धोक्याचे, उपाययोजनांची मागणी

दहा वर्षापासून सुरू असलेला वाद संपुष्टात

महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने दहा वर्षापासून सुरू असलेला वाद संपुष्टातआला आहे. २० फूट रुंदीचा हा शेतरस्ता गेली दहा वर्ष बंद होता. ७० ते ८० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. शेतरसत्याच्या या रखडलेल्या प्रश्नावर प्रशासनाने वेळेत कारवाई केली . प्रत्यक्ष जागेवर जाऊन महसूल विभागाने ही कारवाई केली.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा