Headlines

तुकाराम मुंढेंना मेल अन् नियमबाह्य गोळ्या देणाऱ्या मेडिकलला टाळं; नांदेडमध्ये FDA कारवाईचा बोलबाला – toshniwal medical sells expired diabetes pills customer complains to tukaram mundhe via mail



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अनेकांवर कारवाई करत गुन्हे देखील दाखल केले जातं आहे. त्यांच्या या तत्परतेचा अनुभव आज नांदेडकराना मिळाला. डॉक्टर लेन भागातील तोष्णीवाल मेडिकल चालकाने ग्राहक हनुमंत वनळेकर यांना चक्क डायबटीजच्या नियमबाह्य म्हणजे एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या गोळ्यांची विक्री केली. नियमबाह्य गोळ्या असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्राहकाने थेट आयुक्त तुकाराम मुंडे यांना मेल केला. त्यानंतर तुकाराम मुंडे यांनी तत्परता दाखवत नांदेडच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांनी मेडिकल चालकाला नियम बाह्य झालेल्या गोळ्या विक्री करताना पडकले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत