Headlines

झिम्बाब्वेला लोळवलं पण भारताला विजयानंतर एक वाईट बातमी, कॅप्टन अय्यरही टेन्शनमध्ये, नेमकं काय झालं?


Shreyas Iyer News : भारतीय संघाने आज झिम्बाब्वे संघाला ९० धावांनी पराभूत करत मालिका खिशात घातली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. मात्र विजयानंतर भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Shreyas Iyer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने यजमान झिम्बाब्वेचा ९० धावांनी पराभव केला. या सामन्यामध्ये पहिल्यांदाच श्रेयस अय्यर कॅप्टन झाल्यापासून टॉस हरला. भारताने पहिली बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये २१९-५ धावा केल्या होत्या. भारताकडून ईशान किशन याने सर्वाधिक ८१ धावा केल्या. तिलक वर्मा यानेही नाबाद ६० धावा करत भारताल २०० धावांचा टप्पा पार करून दिला. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला १७.५ ओव्हरमध्ये १२९ धावांवर ऑल आऊट केलं. भारताचा हा सलग दुसरा विजय असून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. भारताने विजय मिळवला खरा पण एक वाईट बातमी भारतासाठी आली आहे. नेमकी काय जाणून घ्या.

भारताचा दुसरा मोहम्मद शमी म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रिन्स यादव याला दुखापत झाली. त्याने फक्त ८ चेंडू टाकले आणि मैदान सोडलं. प्रिन्सने आज फक्त आठ चेंडू टाकले पण महत्त्वाच्या दोन विकेट घेतल्या होत्या. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याची होती.
Maharashtra Timesind VS zim 2ND T20 : झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत भारताकडे विजयी आघाडी, अभिषेक शर्माच्या 3 विकेट; कोणी फिरवली मॅच?

नेमकं काय झालं?

झिम्बाब्वेचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. तेव्हा ब्रायन बेनेट याने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण चढवले होते. त्याने १९ चेंडूत ३२ धाव करताना त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले होते. त्यावेळी भारतीय गोलंदाजांवर काहीसा दबाव वाढला होता, मात्र यश ठाकूर याने बेनेटला आऊट करत पहिला धक्का दिला. त्यानंतर ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर प्रिन्स यादव याने बेन कुरानला पहिल्याच चेंडूवर आऊट करत दुसरा धक्का दिला होता. त्या ओव्हरमध्ये १० धावा त्याने दिल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टन सिकंदर रझा याला आऊट करत दुसरी विकेट नावावर केली पण त्याच्या उजव्या पायाच्या मांसपेशी ताणले गेल्याने त्याला मैदान सोडावं लागलं.
Maharashtra TimesIND vs ZIM 2nd T20 : झिम्बाब्वेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, भारतीय संघात एक बदल; वैभव-अभिषेक फोडून काढणार?
दरम्यान, सामना संपल्यावर बोलतान कॅप्टन श्रेयस अय्यर याला तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यातील प्लेइंग ११ बाबत बोलताना त्यामध्ये काही बदल होतील असे सांगितले. दुर्दैवाने प्रिन्स यादव हा जखमी झाला आहे त्यामुळे काही बदल पाहायला मिळू शकतात, असे श्रेयस म्हणाला.