Headlines

ज्युनियर डॉक्टरची रॅगिंगमुळे आत्महत्या


वृत्तसंस्था/ सुरत

गुजरातमधील सुरतच्या न्यू सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रथम वर्षाचा निवासी डॉक्टर हर्ष पंड्या याने रॅगिंगच्या त्रासातून आत्महत्या केली. याप्रकरणी द्वितीय वर्षाच्या चार वरिष्ठ निवासी डॉक्टरांवर रॅगिंगचा आरोप आहे. त्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सोमवारी या चौघांविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. या घटनेप्रकरणी विभागप्रमुख आणि तीन प्राध्यापकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची रॅगिंगविरोधी समिती, रॅगिंगविरोधी पथक आणि महाविद्यालय परिषदेने केलेल्या तपासात आरोपी डॉक्टर काही ज्युनियर सहकाऱ्यांचा छळ करत असल्याचे स्पष्ट झाले. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मायक्रोबायोलॉजी विभागाचा सदस्य असलेल्या हर्ष पंड्याने रविवारी रात्री आपल्या खोलीत गळफास घेत आत्महत्त्या केली होती.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत