Headlines

जीवदान मिळावं तर असं! लॉर्ड्सवर शतक ठोकून यास्तिकानं इतिहास रचला, पण 43 व्या ओव्हरमध्येच ती बोल्ड झालेली, काय घडलेलं?


Yastika Bhatia Lords Century : सचिन तेंडुलकरलाही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावता आलं नव्हतं. यास्तिका भाटियाने मात्र पहिल्याच महिला कसोटीत इतिहास रचला. पण या शतकाआधी असा एक क्षण आला होता, ज्यामुळे तिचा डाव तिथेच संपला असता. नेमकं काय घडलं होतं?

Yastika Bhatia Century Lords
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज यास्तिका भाटियाने इतिहास रचलाय. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या पहिल्याच महिला कसोटी सामन्यात यास्तिकाने शानदार शतक ठोकण्याचा महापराक्रम केला आहे. या मैदानावर शतक झळकावणारी ती जगभरातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे यास्तिकाचे नाव आता लॉर्ड्सच्या प्रतिष्ठित ‘ऑनर्स बोर्ड’वर कोरले जाणार आहे. भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर यालाही लॉर्ड्सवर कधी शतक ठोकता आलं नव्हतं, पण यास्तिकाने पहिल्याच टेस्टमध्ये हा कारनामा केला. मात्र, या सामन्यात एक मोठी घटना घडली होती, ज्यामुळे तिचे हे शतक हुकले असते.

५० धावांच्या आतच खेळ संपला असता

तिच्या या ऐतिहासिक शतकामागे नशिबाचीही मोठी साथ होती. अन्यथा यास्तिका ५० धावांच्या आतच पॅव्हेलियनमध्ये परतली असती. झालं असं की, लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्मृती मंधाना (६९ रन्स) आणि यास्तिका भाटिया (३९ रन्स) मैदानावर उतरल्या होत्या. इंग्लंडकडून दिवसाची पहिली आणि डावातील ४३ वी ओव्हर घेऊन लॉरेन बेल आली होती.

लॉरेनच्या पहिल्याच बॉलवर यास्तिकाच्या बॅटची कडा लागून बॉल थेट स्टम्पवर आदळला. बॉल स्टम्पला लागल्याचा आवाजही सर्वांनी ऐकला, पण नशिबाची साथ एवढी जबरदस्त होती की स्टम्पवरील बेल्स (Belts) खाली पडल्याच नाहीत. दिवसाच्या पहिल्याच बॉलवर मिळालेल्या या अजब जीवनदानानंतर यास्तिकाने मागे वळून पाहिले नाही आणि इतिहास रचला.

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Video : प्लेइंग 11 मधून वगळताच 15 वर्षीय वैभवला अश्रू अनावर; खांद्यावर हात ठेवून कोणी दिला धीर?

दुखापतीवर मात करत रचला इतिहास, गांगुली क्लबमध्ये एन्ट्री

यास्तिका भाटियाने १४५ बॉल्समध्ये तिचे शतक पूर्ण केले आणि एकूण १५८ बॉल्समध्ये १४ फोर मारत ११३ रन्सची ऐतिहासिक खेळी केली. महिला कसोटीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या डावात भारतासाठी ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. यास्तिकाने १९८५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ९८ रन्स करणाऱ्या संध्या अग्रवाल यांचा ४१ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. याशिवाय सौरव गांगुलीने १९९६ मध्ये लॉर्ड्सवर १३१ रन्स केले होते, त्यानंतर लॉर्ड्सवर शतक ठोकणारी यास्तिका ही भारताची दुसरी डावखुरी क्रिकेटपटू ठरली आहे.

Maharashtra TimesDeep Dasgupta : टीम इंडियाची कामगिरी अत्यंत सुमार आणि दर्जाहीन! इंग्लंडविरुद्ध संघाचा धूर निघाल्यानंतर भारताच्या माजी विकेटकीपरने गंभीर-श्रेयसला सुनावलं

मागच्या वर्षी विशाखापट्टणम येथे वनडे वर्ल्ड कपच्या तयारी शिबिरादरम्यान यास्तिकाच्या डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. सर्जरी आणि अनेक महिन्यांच्या खडतर रिहॅबिलिटेशननंतर तिने हे दमदार पुनरागमन केले आहे. “ज्यांना एसीएल सर्जरी करावी लागते, त्यांना माहिती आहे की पायाची मांसपेशी जवळपास संपलेली असते आणि शून्यापासून सुरुवात करावी लागते. कुटुंब, मित्र आणि जेमिमा रॉड्रिग्जने मला खूप हिंमत दिली,” अशी भावूक प्रतिक्रिया तिने दिली.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा