Headlines

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक:खासदार कल्याण काळे, आमदार संजना जाधव विजयी, शेतकरी विकास पॅनलचे 5 उमेदवार आघाडीवर




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी विजय मिळवला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बिगर शेती मतदारसंघात खासदार कल्याण काळे यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. या मतमोजणीत कल्याण काळे यांना तब्बल 48 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अभिजीत देशमुख यांना केवळ 26 मतांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. संजना जाधवांना 98 मते या निवडणुकीत आमदार संजना जाधव यांनीही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांना 98 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या इतर चारही उमेदवारांना शून्य मते मिळाली. अंबादास दानवेंसह शेतकरी विकास पॅनलचे 5 जण आघाडीवर पहिल्या फेरीत शेतकरी विकास पॅनल मधील बिगर शेती मधील पाचही उमेदवार आघाडीवर आहेत. ओबीसी विकास मंत्री. अतुल सावे, अंबादास दानवे, अर्जुन नितीन पाटील आणि रामू काका शेळके आणि रवि काळे यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली आहे . हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत