Headlines

चांदणी चौकातील रस्त्यासाठी १६४ कोटींची निविदा ; उड्डाणपूल ,ग्रेड सेपरेटर, पुलाचा समावेश


Pune News: चांदणी चौक ते भूगाव या रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपूल ,ग्रेड सेपरेटर आणि पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. महापालिकेने १६५ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिध्द केली.

चांदणी चौक
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी ,पुणे :सातत्याने वाहतूक कोंडी होणाऱ्या एनडीए (चांदणी) चौक ते भूगाव या रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या रस्त्यासाठी आवश्यक जागेपैकी ८० टक्के जागेचे संपादन झाल्याने महापालिकेने यासाठी १६४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा गुरुवारी प्रसिद्ध केली आहे.

महापालिका प्रशासनाने केला दावा

या कामामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. चांदणी चौकापासून भूगावकडे जाताना दोन किलोमीटरपर्यंत महापालिकेची हद्द आहे. मुळशीकडून कोकणाकडे जाणारी वाहतूक याच मार्गाने जाते; तसेच या मार्गावरून पिरंगुट औद्योगिक वसाहत आणि भूगाव, भुकूम व इतर गावांतील वाहतूक चालते. भूगाव, भुकूम परिसर वेगाने विकसित होत असून, येथील लोकसंख्या लवकरच तीन लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

Maharashtra TimesRamesh Mhatre : महाराष्ट्राबाहेर राहा, डोंबिवली डॉक्टर केसमधील मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामिनावेळी कठोर अटी, उच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी

कामासाठीची निविदा काढण्यात आली

त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल; तसेच ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Maharashtra TimesGanesh Chaturthi: आता गणपती बाप्पांच लोकेशन होणार ट्रॅक ; विसर्जन वाहनांवर यंदा जीपीएस प्रणाली
महापालिका प्रशासनाने चांदणी चौक ते भूगाव दरम्यान २.२ किलोमीटर मार्गावर६० मीटर रुंद उड्डाणपूल, राम नदीवर ७० मीटर लांबीचा पूल, पीव्हीपीआयटी कॉलेज चौकात सुमारे ४३० मीटर लांबीचा भुयारी मार्ग; तसेच उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्त्यांचे नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी ८० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या कामासाठीची निविदा काढण्यात आली आहे.

. २.२ किलोमीटर – चांदणी चौक ते भूगाव दरम्यान मार्ग

. ६० मीटर रूंद -उड्डाणपूल उभारणार

. ७० मीटर लांबी – राम नदीवरील पूल

. ४३० मीटर लांबी – पीव्हीपीआयटी कॉलेज चौकातील भुयारी मार्ग

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा