Headlines

Uday Samant Clarifies on Manoj Jarange Kunbi Reservation Allegations


कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी पत्र काढण्यात आले असून, मराठ्यांच्या नोंदी कमी करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच केला होता. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, राज्याचे उद

.

‘हे सर्व गैरसमजातून घडत आहे’

मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या कुणबी नोंदींच्या मुद्द्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाबाबत मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही सविस्तर चर्चा केली आहे. बावनकुळे यांनीही स्पष्ट केले आहे की, सध्या जे काही घडत आहे ते केवळ गैरसमजातून होत आहे. महायुती सरकारने मराठा समाजाप्रती जे निर्णय घेतले आहेत, ते बदलण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही आणि तसे होणारही नाही.”

मुख्यमंत्र्यांबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज

सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही व्हिडिओंचा संदर्भ देत सामंत यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “काही व्हिडिओ पाहून तुम्हाला समजले असेल की काही लोक जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण आणि कुणबी दाखल्यांबाबत घेतलेली भूमिका ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीच घेतली आहे, हे विसरता कामा नये.”

ओबीसींवरही अन्याय होऊ देणार नाही

मराठा समाजाला आश्वस्त करतानाच, ओबीसी समाजालाही सामंत यांनी शब्द दिला आहे. “मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावरही कोणताही अन्याय होणार नाही, ही महाराष्ट्र सरकारची पहिल्यापासूनची ठाम भूमिका आहे. जर गरज पडली, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशीही सरकार सकारात्मक चर्चा करण्यास तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘जातीपातीच्या भिंती उभ्या करू नका’

राज्यातील वाढत्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांना महत्त्वाचे आवाहन केले. “आपला महाराष्ट्र हा एकसंघ आहे. त्यामुळे जातीपातीच्या राजकारणामुळे समाजामध्ये उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत, याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी. महाराष्ट्रातील कोणत्याही जाती-धर्मावर अन्याय होणार नाही, हीच महायुती म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे,” असे सामंत यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा…

मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा सरकारचा कट!:नेत्यांची पोरं परदेशात, कार्यकर्त्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय; पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या सुरुवातीलाच जरांगेंचा घणाघात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आगामी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अंतरवाली सराटी येथून आपल्या ‘पश्चिम महाराष्ट्र’ दौऱ्याला सुरुवात केली आहे. हा दौरा १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, यादरम्यान ते विविध जिल्ह्यांत जाऊन समाजाशी संवाद साधणार आहेत. मात्र, दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वीच माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांवर आणि सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत