Apply New PAN Card: आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पॅन कार्ड (PAN Card) काढणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयकर विभागाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे युजर्स कोणत्याही कागदपत्रांची फिजिकल कॉपी न पाठवता, केवळ आधार कार्ड आणि ई-केवायसीच्या माध्यमातून नवीन पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

नवे पॅन कार्ड डिजिटल पद्धतीने अवघ्या 10 मिनिटांत मिळवणे शक्य झाले असून, e-PAN पूर्णपणे मोफत डाउनलोड करता येते. भारत सरकारच्या आयकर विभागाने NSDL/Protean आणि UTIITSL पोर्टलवर नवीन पॅन कार्डसाठी संपूर्ण प्रक्रिया कागदपत्रविरहित आणि डिजिटल केली आहे.
नवीन पॅन कार्ड काढण्याची ऑनलाईन पद्धत आणि त्याचा नेमका खर्च खालीलप्रमाणे आहे.
पॅन कार्डच्या अर्जासाठी लागणारा खर्च
तुम्हाला प्लास्टिकचे पॅन कार्ड घरपोच हवे असेल, तर इंटरनेट बँकिंग/कार्डद्वारे 107 रुपये (GST सह) शुल्क भरावे लागते. जर तुम्हाला फक्त ई-मेलवर PDF स्वरूपात पॅन कार्ड हवे असेल, तर त्यासाठी केवळ 72 रुपये फी लागते. आयकर विभागाच्या ‘e-Filing’ पोर्टलवरून आधार कार्डच्या मदतीने मिळणारे इन्स्टंट पॅन कार्ड पूर्णपणे मोफत असते. जर पॅन कार्ड भारताबाहेरील पत्त्यावर मागवायचे असेल, तर 1,011 रुपये शुल्क आकारले जाते.
ऑनलाईन अर्ज करण्याची ‘स्टेप-बाय-स्टेप’ टेक प्रोसेस
- अधिकृत पोर्टलला भेट द्या: सर्वप्रथम ‘Protean’ (पूर्वीचे NSDL) किंवा ‘UTIITSL’ च्या अधिकृत पॅन कार्ड पोर्टलवर जा.
- अर्ज प्रकार निवडा: होमपेजवर ‘Apply Online’ निवडून ‘Application Type’ मध्ये ‘New PAN – Indian Citizen (Form 49A)’ हा पर्याय निवडा आणि कॅटेगरीमध्ये ‘Individual’ सिलेक्ट करा.
- वैयक्तिक माहिती भरा: तुमचे नाव, आडनाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक भरा. सर्व माहिती सबमिट केल्यावर स्क्रीनवर एक ‘टोकन नंबर’ (Token Number) जनरेट होईल, तो जतन करून ठेवा.
- डिजिटल ई-केवायसी: पुढे तुम्हाला तीन पर्याय मिळतील. त्यापैकी ‘Submit digitally through e-KYC & e-Sign (Paperless)’ हा पर्याय निवडा. या तंत्रज्ञानामुळे तुमच्या आधार कार्डवरील फोटो आणि पत्ता आपोआप पॅन कार्डसाठी घेतला जातो, ज्यामुळे वेगळे कागदपत्र अपलोड करावे लागत नाहीत.
- आधार क्रमांक आणि फी भरणे: तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक टाका. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने 107 रुपये (किंवा निवडलेल्या पर्यायानुसार) फी भरा.
आधार OTP प्रमाणीकरण
फी भरल्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो स्क्रीनवर टाकून डिजिटल स्वाक्षरी प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज यशस्वी झाल्यावर पोचपावती डाऊनलोड करा. पुढील 2 आठवड्यांत पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.

