Headlines

गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत


कारचालकाच्या अटकेनंतरही आरोपी फरारच : पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलण्याची गरज

   त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारानंतर संशयितांनी पुणे गाठल्याची माहिती उघडकीस आली असून बेळगाव येथील गोळीबारासाठी पिस्तूल कोठून आणल्या? याचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत.

बेळगाव पोलिसांनी एका कारचालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली असून ज्या प्रफुल्ल पाटीलवर एफआयआर दाखल झाला आहे तो युवकही अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. रमी क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराचे मूळ कारण अंदर-बाहर क्लब चालविण्यावर सुरू झालेली चढाओढ हेच आहे.

मंगळवार दि. 14 जुलै रोजी रात्री सुरेश मुनीस्वामी जालगार (वय 42) याच्यावर युनियन जिमखाना येथील रमी क्लबवर गोळीबार झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर कॅन्टोन्मेंट व लष्कराने जिमखान्यालाच टाळे ठोकले असले तरी या प्रकरणात फरारी असलेल्या आरोपींचा अद्याप तपास लागला नाही. गोळीबारानंतर ज्या कारमधून संशयितांनी पुणे गाठले होते, त्या कारच्या चालकाला अटक करून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे.

कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गोळीबाराची ही घटना घडली असली तरी त्याचे मूळ मात्र ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात आहे.  अंदर-बाहर जुगारी अ•s चालविण्यावरून सुरू झालेल्या चढाओढीमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून दोन गटात जीवघेणा संघर्ष सुरू झाला असून या संघर्षातूनच एकमेकांना संपविण्यासाठी चाकू हल्ला, गोळीबार केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

यापूर्वी दोन गटात तीनहून अधिक हल्ल्याच्या घटना घडूनही पोलीस दलाने गांभीर्याने घेतले नाही. उलट गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून असलेल्या काही जुन्या पोलिसांचे लागेबांधे या जुगारी अ•sचालकांबरोबर आहेत. त्यामुळेच पोलीस दलाचे प्रत्येक पाऊल अ•sचालकांना आधीच समजते.

राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी अलीकडेच सर्व जिल्हा पोलीसप्रमुख व पोलीस आयुक्तांना पत्रे पाठवून पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पोलीस स्थानकात तळ ठोकून असलेल्या हवालदार व पोलिसांची विनाविलंब बदली करण्याची सूचना केली आहे. तरीही या सूचनेची अंमलबजावणी होताना दिसत नाही. इतर पोलीस स्थानकात पोस्टींग असूनही बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱ्या काही पोलिसांच्या गुन्हेगारांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे जुगारी अ•s उदंड झाले असून पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी वेळीच कारवाई हाती घेतली नाही तर या संघर्षाला गँगवॉरचे स्वरुप येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत