अभिनेत्री संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी यांच्या आयुष्यात जुळ्या बाळांच्या आगमनाने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या नामकरण सोहळ्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.या खास सोहळ्यात बाळांसोबतच संभावना सेठच्या सुंदर आणि आकर्षक घराच्या सजावटीचीही जोरदार चर्चा झाली.

संभावना सेठने आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आई होण्याच्या प्रवासात तिला कठीण काळातून जावे लागले होते. गर्भावस्थेदरम्यान बाळाच्या हृदयाचे ठोके थांबल्याने तिला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला होता. या वेदनादायक अनुभवातून सावरल्यानंतर अनेक वर्षांनी तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आले आहेत. जुळ्या बाळांच्या आगमनाने संभावना आणि तिच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे.(फोटो सौजन्य :- @sambhavnasethofficial, @Sambhavna Seth Entertainment)
व्हाईट थीमचा वापर
संभावना सेठच्या घराच्या सजावटीतील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे व्हाईट थीमचा सुंदर वापर. पांढरा रंग घराला केवळ आलिशान लूक देत नाही, तर तो घरातील वातावरण अधिक शांत, स्वच्छ आणि प्रशस्त असल्याचा भास निर्माण करतो. नामकरण सोहळ्यासाठी केलेल्या सजावटीतही पांढऱ्या रंगाचा एलिगंट टच दिसून आला. व्हाईट थीमसोबत सौम्य लाईटिंग, फुलांची सजावट आणि मिनिमल डेकोरचा वापर केल्याने घराला मॉडर्न आणि प्रीमियम लूक मिळतो. विशेषतः पांढऱ्या रंगाच्या भिंती, फर्निचर किंवा सजावटीच्या वस्तूंसोबत गोल्डन, बेज किंवा पेस्टल शेड्सचा वापर केल्यास घर अधिक आकर्षक दिसते.
कॉफी मगसाठी खास जागा
संभावना सेठच्या घराच्या सजावटीतील आणखी एक आकर्षक कल्पना म्हणजे कॉफी मगसाठी तयार केलेली खास जागा. आजकाल घराच्या डेकोरमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींना महत्त्व दिले जाते. सकाळच्या कॉफीचा आनंद घेण्यासाठी किंवा पाहुण्यांना कॉफी सर्व्ह करण्यासाठी एक सुंदर कॉफी कॉर्नर घराला वेगळा आणि स्टायलिश लूक देऊ शकतो. कॉफी मग ठेवण्यासाठी ओपन शेल्फ, वॉल रॅक किंवा छोटा कॉफी स्टेशन तयार करता येतो. यावर सुंदर मग्स, कॉफी जार, छोट्या झाडांच्या कुंड्या आणि डेकोरेटिव्ह लाईट्स ठेवून आकर्षक कोपरा तयार करता येतो.
साध्या गोष्टींनी सजवा घर
घर सजवण्यासाठी नेहमी महागड्या डेकोरेशन वस्तूंची गरज नसते. संभावना सेठच्या घराच्या सजावटीप्रमाणेच साध्या, पण सुंदर कल्पनांचा वापर करून घराला एलिगंट आणि आलिशान लूक देता येतो. कमी गोष्टींमध्येही घर आकर्षक, उबदार आणि स्टायलिश दिसू शकते.व्हाईट थीम, मिनिमल डेकोर आणि छोट्या-छोट्या बारकाव्यांमुळे घराला खास व्यक्तिमत्त्व मिळते. तुम्हीही काही सोप्या टिप्स वापरून घराचा लूक बदलू शकता.
हलक्या रंगांना द्या प्राधान्य
पांढरा, क्रीम, बेज, पेस्टल आणि हलके ग्रे यांसारखे रंग घराला शांत आणि प्रशस्त लूक देतात. विशेषतः लहान जागांसाठी हे रंग अधिक योग्य ठरतात. व्हाईट थीमसोबत सौम्य रंगांचे कॉम्बिनेशन केल्यास घरात आलिशानपणा जाणवतो.
घरात फोटो फ्रेमचा वापर करा
घराची सजावट केवळ महागड्या वस्तूंनी होत नाही, तर त्यात आठवणींचा स्पर्श असेल तर ते घर अधिक सुंदर आणि आपलेसे वाटते. फोटो फ्रेम्स हा घर सजवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. संभावना सेठच्या घराच्या मिनिमल आणि एलिगंट डेकोरप्रमाणेच, योग्य पद्धतीने फोटो फ्रेम्सचा वापर केल्यास घराला स्टायलिश तसेच वैयक्तिक लूक मिळतो.

