Headlines

‘गंभीरचे काही आवडते खेळाडू आहेत आणि तो त्यांना घेऊनच खेळतो’; माजी क्रिकेटपटूचा गंभीरवर खळबळजनक आरोप


Hanuma Vihari on Gautam Gambhir : भारतीय संघाने पाठोपाठ दोन टी-२० मालिका गमावल्या. यामधील एक मालिका तर दुबळ्या आयर्लंड संघाविरूद्ध भारताने गमावली होती. ज्यांनी कधी एक सामना जिंकला नव्हता त्यांनी आपल्याला व्हाईटवॉश दिला. इंग्लंडमध्येसुद्धा तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर बोलताना माजी क्रिकेटपटूने गंभीरवर खळबळजनक आरोप केला आहे.

Gautam Gambhir
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघाने मागील दोन टी-२० मालिका गमावल्या. दुबळ्या आयर्लंडकडून भारताला २-० ने व्हाईटवॉश मिळाला होता. त्यापाठोपाठ इंग्लंडकडूनही ४-० ने पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला टी-२० मधील प्रतिभेला साजेशी कामगिरी करता आली नाही. अडीच वर्ष एकही मालिका न गमावलेल्या भारताला सलग दोन मालिकांमध्ये व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. त्यामुळे माजी खेळाडूंनी कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन श्रेयस अय्यर यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच माजी क्रिकेटपटू हनुमान विहारीने थेट गौतम गंभीरवर एक खळबळजनक आरोप केलाय.

गौतम गंभीरचे काही आवडते खेळाडू आहेत आणि तो त्यांना घेऊनच खेळतो. या खेळाडूंना खेळवण्यात मला तथ्य वाटत नाही. भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत जे अजूनही समजलं नाही की ते नेमकं काय करत आहेत. शिवम दुबे बॉलिंग करत नाही ना फिल्डिंग आणि बॅटिंगमध्ये फार काही चमकदार कामगिरी करू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदर अजूनही संघात का आहे हे समजण्यापलीकडे आहे. कारण मागील काही वर्षांमध्ये त्याने फार काही योगदान दिले नाही, असं म्हणत हनुमा विहारीने गंभीरवर जाहीरपणे टीका केलीय.
Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI : श्वास रोखून धरा, धुरळा उडणार हाय! रोहित शर्माला इंग्लंडविरूद्ध वन डे मालिकेत इतिहास रचण्याची संधी, हिटमॅन ठरणार नंबर वन?
संघातील खेळाडूंना सुरक्षित वाटत नाही, कारण तुम्ही जर फॉर्ममध्ये नसाल तर तुम्हाला संघातून बाहेर केलं जातं. परंतु खेळाडूंना संधी दिली पाहिजे. जर तुम्हाला वैभव सूर्यवंशीला खेळवायचंच होतं तर मग त्याला पाचही सामन्यांमध्ये संधी द्यायला हवी होती. खेळाडूंना आपली जागा सुरक्षित वाटणं खूप गरजेचं असल्याचं विहारी म्हणाला.
Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI : याला बोलतात सोच! इंग्लंडविरूद्ध रो-को मैदानात, वर्ल्ड कप 2027आधी कोहलीचा कॅप्टन गिलला सल्ला, शुबमनने जाहीरपणे सांगितला
दरम्यान, ज्यावेळी सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार होता त्यावेळी संघामध्ये खूप कमी बदल पाहायला मिळत होते. परंतु आता झालेल्या दोन मालिकांमध्ये संघात अनेक बदल पाहायला मिळाले. वर्ल्डकपमध्ये ही सूर्यकुमारने नेतृत्व करताना संघात खूप कमी बदल केले होतेय. मला संजू सॅमसनविषयी वाईट वाटतं, कारण त्याला बळीचा बकरा बनवलं गेलं. ज्यावेळी वैभव सूर्यवंशी तीनही सामन्यात अपयशी ठरला त्यानंतर सॅमसनला संधी दिली गेली, असंही विहारी म्हटलं आहे

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा