बारामतीत रोहित पवार यांच्या पीएच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वत:ला संपवून घेतल्याची घटना समोर आली. तिचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने विविध चर्चा सुरु होत्या. अखेर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या विषयी सविस्तर माहिती दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मुलीने दोन दिवसांपूर्वी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती. 14 वर्षीय मुलीने स्वत:ला संपवल्याचा प्रकार समोर आला होता. पण तिच्या मृत्यूच्या घटनेवर संशय व्यक्त केला जात होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. या तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सत्य समजले. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद अल्पवयीन मुलीने असा टोकाचं पाऊल का उचलला? याचे कारण सांगितलं आहे.
बारामतीत आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहायकाच्या मुलीने दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या संदर्भात आत्महत्येचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी पोलिसांकडे दिला. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दुसरे कोणतेही कारण यात सहभागी नसून तिची आत्महत्याचा असल्याचा निर्वाळा दिला. तसेच अल्पवयीन मुलीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचं देखील कारण पोलिसांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं होतं?
खरंतर अल्पवयीन 14 वर्षीय मुलगी ही आईने रागावले म्हणून संतापात घरातून निघून गेली होती. ती रात्रभर घरी परतली नव्हती. त्यामुळे कुटुंबियांकडून शोधाशोध सुरु होती. पण कुठेच तिचा शोध लागत नसल्याने कुटुंबियांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून या प्रकरणी शोध सुरु असतानाच शहरातील एका पाच मजली इमारतीत या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी काय सांगितले?
अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद आढळल्याने मोठी चर्चा झाली होती. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी देखील पोलिसांना सूचना देऊन काटेकोरपणे तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुलीच्या आत्महत्येच्या कारणाची माहिती दिली. आईने रागावले म्हणून म्हणून मुलीने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
मुलगी इमारतीच्या जिन्यावरून जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यानंतर सहाव्या मजल्यावरून तिने उडी मारतानाचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालात देखील ही आत्महत्या असल्याचे सांगितले. आता मुलीचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाल्याने आम्ही तशा प्रकारची नोंद करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पीडित कुटुंबाच्या घरी चोरीची घटना
दुसरीकडे मुलीचे कुटुंब अंत्यसंस्काराच्या आणि इतर विधीच्या निमित्ताने गावी असतानाच त्यांच्या बारामतीतील घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यामध्ये किती चोरी झाली हे मात्र समजू शकलेले नाही. दरम्यान, दुसरीकडे मुलीच्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील सणसर जाचक वस्ती या गावी गेलेल्या या कुटुंबाचे घर अज्ञात चोरट्याने मात्र फोडले आहे. या प्रकरणी अध्याप चोरीचा गुन्हा दाखल झाला नसला तरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मात्र या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे आणि संबंधित कुटुंबाची तक्रार देण्याची इच्छा नसण्याची पत्रकार परिषदेत सांगितले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा