Headlines

कधी आईसारखी जपते, कधी मैत्रिणीसारखी समजून घेते! गौतमी देशपांडे म्हणते ताई माझं सर्वस्व, सेलिब्रिटी बहिणींनी व्यक्त केल्या भावना


मोठी बहीण कधी आईसारखी जपते, कधी मैत्रिणीसारखी समजून घेते, तर कधी भावासारखी खंबीरपणे पाठीशी उभी राहते. राखी बांधली किंवा नाही, तरी एकमेकींसाठी कायम सोबत असण्याची भावना या नात्याला अधिक खास बनवते. रक्षाबंधनाच्या निमित्तानं काही अभिनेत्रींनी त्यांच्या बहिणींसोबतच्या अशाच जिव्हाळ्याच्या नात्याविषयी ‘मुंटा’ला सांगितलं.

ताई माझं सर्वस्व-गौतमी देशपांडे

लहानपणापासूनच ताई म्हणजे अभिनेत्रीमृण्मयी देशपांडे म्हणेल आणि करेल तसं… अशीच मी वागायचे. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळ्याचा सण. बहिणींच्या नात्यात हे संरक्षणाचं नातं कोणत्याही वचनाशिवाय आपसूकच फुलत जातं. एकमेकींना समजून घेणं, नकारात्मकतेपासून दूर ठेवणं, तारुण्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर योग्य मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी करताना ताई अनेक भूमिका निभावत असते. ती कधी मैत्रीण होते, कधी भाऊ बनून खंबीरपणे साथ देते, तर कधी आईची माया देते. कधी तरी लहान बहिणीनं मोठ्या बहिणीची भूमिका घेण्याचीही गरज असते; त्यावेळी ताईसाठी भावनिक आधारापासून ते तिच्या संरक्षणापर्यंत मी नेहमीच तिच्यासोबत असते आणि पुढेही कायम असणार आहे. प्रत्येक वेळी आम्ही एकमेकींना राखी बांधतोच असं नाही. राखी बांधली नाही, तरी एकमेकांविषयीच्या भावना त्याच असणार आहेत. ताई माझं सर्वस्व आहे!

– गौतमी देशपांडे , अभिनेत्री

Maharashtra TimesOrry Slams Amrita Singh: ‘प्रचंड मानसिक त्रास, नरकयातना दिल्या, वाईट लोकांसोबत वाईटच घडतं’, ऑरीचा अमृता सिंगवर निशाणा, इंडस्ट्रीत खळबळ
जिव्हाळ्याचं नातं

मी आणि माझी बहीण अभिनेत्री चैत्राली गुप्ते आम्हा बहिणींमधलं नातं खूप खास आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानं ते घट्ट नातं आणखी अनुभवायला मिळतं. आम्ही कितीही व्यग्र असो, भेटीगाठी कमी होवो; आमच्यातलं जिव्हाळ्याचं नातं तसंच आहे. रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणं नाही, तर काळजी घेणं, आणि सोबत असणं. आम्ही अनेक वर्षांपासून एकमेकींना राखी बांधत आहोत. भाऊ-बहीण असो किंवा बहिणी हे नातं सगळ्या गोष्टींपलीकडचं आहे. आम्हाला एकमेकांच्या अनेक गोष्टी पटतही नाहीत. पण आम्ही ते व्यक्त करतो. आम्ही एकमेकांचे समीक्षकही असतो, अनेकदा भांडतोही. पण तरीही या नात्यातली नाळ शब्दातीत असते.

भार्गवी चिरमुले , अभिनेत्री

Maharashtra TimesRaksha Bandhan:काही नाती रक्ताची, काही मनाची, प्रत्येक कथेत भाऊ-बहिणीच्या नात्याची ऊब, हे सिनेमे आज पाहाच
खुशबूच्या पावलावर पाऊल

माझी बहीण अभिनेत्री खुशबू तावडे माझी सर्वात जवळची मैत्रीण आणि खऱ्या अर्थानं माझी ‘गाइड’ आहे. लहानपणापासून मी तिला बघूनच सगळं शिकलेय. अगदी अभिनयात पाऊल ठेवण्यापासून, क्रिकेट खेळण्यापासून ते व्यवसाय करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मी तिच्याकडून आत्मसात केली आहे. माझ्या आयुष्यातील अनेक घडामोडी केवळ तिच्यामुळेच घडल्या आहेत. आमच्या नात्यात महत्त्वाचा आहे तो संवाद ! एकमेकांना सल्ला देणं, कौतुक करणं किंवा समीक्षक होणं हे आम्ही नेहमीच करत असतो. आम्हाला एखादी गोष्ट पटली तर तसं सांगतो, तसंच खटकली तर त्याविषयीही बोलतो. आम्ही एकमेकींच्या आयुष्यात विविध भूमिका कायमच बजावत आलो आहोत. आज आम्ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहोत. तरी अमच्यातलं नातं आजही तसंच आहे.

– तितीक्षा तावडे, अभिनेत्री

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत