Headlines

कचऱ्याच्या डब्याकडे दुर्लक्ष करण्याआधी हे नक्की वाचा! घरकाम करणाऱ्या भावना ताईंची गोष्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल – how to keep kitchen dustbin smell free with help of baking soda


किचनमधील स्वच्छतेसोबत कचऱ्याच्या डब्याची स्वच्छता करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.ओला कचरा आणि अन्नाच्या अवशेषांमुळे डस्टबिनमधून येणारा दुर्गंधीचा त्रास वाढू शकतो.महागड्या फ्रेशनर्सऐवजी घरातील बेकिंग सोड्याच्या मदतीने डस्टबिनचा वास सहज कमी करता येतो.सोशल मीडियावर भावना ताईंनी हा साधा उपाय सांगितला आहे.

natural home remedies to remove smell
फोटो सौजन्य :- @bhawna_didi, iStock
किचनमध्ये स्वच्छता राखताना आपण अनेकदा गॅस, ओटा, भांडी आणि फरशीकडे लक्ष देतो; पण कचऱ्याचा डबा हा देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे. अनेक घरांमध्ये कचऱ्याच्या डब्यातून येणारा वास ही मोठी समस्या असते. ओला कचरा, अन्नाचे उरलेले पदार्थ, फळांची साले आणि भाज्यांचा कचरा यामुळे काही वेळातच डस्टबिनमधून दुर्गंधी येऊ लागते.भावना ताईंनी सांगितलेली एक गोष्ट अनेकांना विचार करायला लावणारी आहे. त्या म्हणतात की, “आपण कचरा टाकून डबा बंद करतो, पण त्याची स्वच्छता विसरतो. त्यामुळे घरात नकळत दुर्गंधी आणि जंतूंची वाढ होऊ शकते.” त्यामुळे कचऱ्याच्या डब्याकडे दुर्लक्ष न करता त्याची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे.यासाठी बाजारातील महागड्या फ्रेशनर्सची गरज नाही. आपल्या घरात सहज उपलब्ध असलेला बेकिंग सोडा किचन डस्टबिनचा वास कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. (फोटो सौजन्य :- @bhawna_didi, iStock)

बेकिंग सोडा दुर्गंधी कशी दूर करतो?

बेकिंग सोडा दुर्गंधी कशी दूर करतो?

बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट हा एक नैसर्गिक गंध शोषून घेणारा पदार्थ आहे. कचऱ्यातून निर्माण होणारे आम्लीय वासाचे घटक बेकिंग सोडा शोषून घेतो आणि त्यामुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.विशेषतः ओला कचरा, कांद्याची साले, फळांची सडलेली साल किंवा अन्नाचे अवशेष यामुळे येणारा वास नियंत्रित करण्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग होतो.

डस्टबिनच्या तळाशी बेकिंग सोडा पसरवा

डस्टबिनच्या तळाशी बेकिंग सोडा पसरवा

कचऱ्याची पिशवी लावण्यापूर्वी डस्टबिनच्या तळाशी न्यूज पेपर टाकून 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा पसरवा. यामुळे कचऱ्यातून बाहेर पडणारा ओलावा आणि दुर्गंधी शोषली जाते.डस्टबिनच्या तळाशी जमा होणारे पाणी आणि चिकटपणा कमी करण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरते.

किंग सोडा आणि पाण्याने डस्टबिन धुवा

किंग सोडा आणि पाण्याने डस्टबिन धुवा
  • यासाठी एका बादलीत कोमट पाणी घ्या.
  • त्यात 3 ते 4 चमचे बेकिंग सोडा मिसळा.
  • या मिश्रणाने डस्टबिन आतून आणि बाहेरून स्वच्छ करा.
  • काही वेळ तसेच ठेवून नंतर कोरडे करा.डस्टबिन पूर्णपणे कोरडा झाल्यानंतरच नवीन कचऱ्याची पिशवी लावा.

बेकिंग सोड्याची छोटी पिशवी ठेवा

जर तुमच्या डस्टबिनमधून वारंवार वास येत असेल तर एका छोट्या कापडी पिशवीत किंवा जुन्या मोज्यात बेकिंग सोडा भरून ती डस्टबिनजवळ ठेवा.हा बेकिंग सोडा हवेतील दुर्गंधी शोषण्यास मदत करेल.

किचनमधील कचऱ्याच्या डब्याचा वास कसा कमी करावा

डस्टबिनचा वास कमी करण्यासाठी काही अतिरिक्त टिप्स

डस्टबिनचा वास कमी करण्यासाठी काही अतिरिक्त टिप्स
  • ओला आणि सुका कचरा वेगळा कराओला कचरा जास्त वेळ डस्टबिनमध्ये राहिल्यास त्यातून वास येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवणे चांगली सवय आहे.
  • कचऱ्याची पिशवी वेळेवर बदलाकचऱ्याची पिशवी पूर्ण भरल्यानंतरच बदलण्याची वाट पाहू नका. विशेषतः अन्नाचा कचरा असेल तर दररोज पिशवी बदलणे योग्य ठरते.
  • डस्टबिन झाकण असलेला वापराझाकण असलेल्या डस्टबिनमुळे दुर्गंधी घरभर पसरत नाही आणि माश्या, कीटक यांचा त्रासही कमी होतो.कोणत्या चुका टाळाव्यात?
    ओला कचरा अनेक दिवस डस्टबिनमध्ये ठेवू नका.
    डस्टबिन स्वच्छ केल्यानंतर तो ओला ठेवू नका.
    फक्त सुगंधी स्प्रे मारून दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न करू नका.
    डस्टबिनच्या तळाशी जमा झालेला चिकट कचरा दुर्लक्षित करू नका.

स्वच्छ डस्टबिन म्हणजे स्वच्छ स्वयंपाकघर

स्वच्छ डस्टबिन म्हणजे स्वच्छ स्वयंपाकघर

किचनमधील कचऱ्याचा डबा हा घरातील स्वच्छतेचा महत्त्वाचा भाग आहे. तो फक्त कचरा टाकण्याची जागा नसून त्याची योग्य काळजी घेतली तर घरातील वातावरण अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी राहते. बेकिंग सोडा हा साधा, स्वस्त आणि सहज उपलब्ध उपाय आहे. नियमित वापर केल्यास किचन डस्टबिनमधील दुर्गंधी कमी होण्यास मदत होऊ शकते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा