Headlines

वनडे वर्ल्ड कपसोबत टी-20 चाही फॉरमॅट बदलला, आयसीसीने असा निर्णय का घेतला? जाणून घ्या


ODI World Cup 2026 : वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या स्वरूपात स्पर्धेगणिक बदल करण्याचे धोरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कायम ठेवले आहे. वन-डे वर्ल्ड कप स्पर्धा चार टप्प्यांत करताना त्यात ‘सुपर सेवन’ हा टप्पा घेण्याचे ठरले. त्याच वेळी टी-२० स्पर्धेत सुपर १०टप्पा आणला आहे.

ICC World Cup New Format News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या स्वरुपात स्पर्धेगणिक बदल करण्याचे धोरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कायम ठेवले आहे. वर्ल्ड कप वनडे स्पर्धा चार टप्प्यात करताना त्यात सुपर सेवन हा टप्पा घेण्याचे ठरले. त्याचवेळी टी-२० स्पर्धेत सुपर टेन टप्पा आणला आहे. वर्ल्ड कप वनडे स्पर्धा १४ संघांची होईल, तर टी-२० स्पर्धा वीस संघांची असेल. वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत एलिमिनेटर सामने होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातील लढतीत वाढ होणार आहे.

निर्णय का घेतला?

एकतर्फी आणि नवख्या संघांच्या सामन्यांना प्रतिसाद कमी लाभत असल्यामुळे या सामन्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम टप्यात जास्त चुरस होईल आणि रंगत वाढेल. अंतिम टप्प्यातील एकतर्फी लढती कमी करण्यासाठीच हा निर्णय झाला आहे.
Maharashtra TimesIND vs ENG: वचन दिलं एक अन् झालं दुसरंच! गंभीरच्या टीम इंडियात अंतर्गत नाराजी, मोठ्या खेळाडूने फिरवली सूत्रं?

टी-२०चा ढाचा

टी-२० स्पर्धेत २० सहभागी संघांची पाच गटांत विभागणी होईल. त्यातून अव्वल दहा संघ ‘सुपर टेन’ टप्प्यास – पात्र ठरतील. दोन गटांतील अव्वल संघ थेट उपांत्य फेरीत जातील. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळतील. उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढतींनी स्पर्धेची सांगता होईल.
Maharashtra TimesINDvsENG 2nd ODI : दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कॅप्टन बदलणार? सामन्याची वेळ बदलली, किती वाजता सुरू होणार?

वर्ल्ड कप वन-डे स्पर्धेचे स्वरूप

  • २०२७मधील स्पर्धेचे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया यजमान.
  • पहिली फेरी त्यातील तळाचे मानांकन असलेल्या तीन संघांत पात्रता साखळी, त्यातील एक संघ प्राथमिक साखळीस पात्र.
  • दुसरी फेरी (३० सामने) पात्र १२ संघांची दोन गटांत विभागणी. प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन संघांची आगेकूच. त्याचबरोबर दोन्ही गटांत मिळून चौथ्या क्रमांकावरील सर्वोत्तम संघासही संधी.
  • तिसरी फेरी (सुपर सेवन २१ सामने) सात संघांत साखळी लढती. अव्वल चार संघ उपांत्य फेरीत
  • बाद फेरीच्या लढती पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाच्या तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघात उपांत्य लढती आणि त्यानंतर विजेतेपदाची लढत

Maharashtra TimesShubman Gill : अरे नावातच ताकद ! रोहित-विराट फेल पण कॅप्टन गिलचा डोळे झाकून विश्वास, मॅच संपल्यावर काय म्हणाला?

असा होईल टी-२० वर्ल्ड कप

  • २० संघांत होणारी स्पर्धा २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये.
  • प्राथमिक साखळी (३० सामने) २० संघांची पाच गटांत
  • विभागणी. यापूर्वी चार गटांत विभागणी होती. अव्वल दोन संघांची आगेकूच
  • सुपर टेन (२० लढती): दहा संघांची दोन गटांत विभागणी. गटविजेते उपांत्य फेरीस थेट पात्र
  • – एलिमिनेटर सामने सुपर टेन गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ या टप्प्यास पात्र, त्यांच्यात क्रॉस सामने. विजेते संघ उपांत्य फेरीत
  • बाद फेरीच्या लढती: एलिमिनेटरमधील विजेते आणि गटविजेते यांच्यात उपांत्य फेरीचे सामने. त्यानंतर विजेतेपदाची लढत.
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा