Washim Viral Video : वाशिममध्ये दोन वर्षांच्या शांभवी चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाप्पाला मोदक भरवलेल्या शांभवीचे प्रेम पाहून कुटुंबीय भावूक झाले. बाप्पाला निरोप देताना तिला रडू आवरलं नाही, तिला पाहून बाप्पालाही पाय निघाला नसावा.
गणेश विसर्जनानंतर चिमुकली भावुक, बाप्पाला परत आणा म्हणत ढसाढसा रडली…व्हिडिओ व्हायरल
वाशिम : गणेशोत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि भावनिक आठवणी घेऊन येतो. वाशिम येथील राम धनगर यांच्या घरातही यंदाचा गणेशोत्सव तितकाच भावनिक ठरला. दोन वर्षांची शांभवी हिच्यासाठी हा उत्सव केवळ रंगतदार कार्यक्रम नव्हता, तर तिच्या छोट्या मनातील भक्ती आणि प्रेमाचा अनमोल अनुभव होता. गणपती बाप्पाच्या विधिवत पूजाअर्चेनंतर कुटुंबीयांनी बाप्पाचे विसर्जन केले. घरात परतल्यावर मखर रिकामे पाहताच शांभवी गोंधळून गेली. “गणपा बाप्पा कुठे गेले?” असा निरागस प्रश्न तिने डोळ्यांत अश्रू घेऊन विचारला.
विसर्जनापूर्वी शांभवीने प्रेमाने बाप्पाला मोदक वाहिला होता. त्या प्रेमाचीच आठवण तिच्या मनात जिवंत होती. मखर रिकामे पाहताच ती बोबड्या आवाजात रडू लागली. आई-वडिलांनी व भावाने तिला समजावत सांगितले, “बाप्पा पुढच्या वर्षी परत येतील.” तरीही तिच्या निरागसतेतून उमटणारे ममत्व पाहून उपस्थित सर्व जण भावूक झाले आणि डोळ्यांत पाणी आले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 50 हजार उकळले, ब्लॅकमेलिंगला कंटाळत तरुणानं… ही घटना गणेशोत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून घराघरातील नातेसंबंध, प्रेम, भक्ती आणि एकोपा यांचा उत्सव आहे हे अधोरेखित करते. शांभवीसारख्या छोट्या मुलाच्या निरागसतेतून गणपती बाप्पावरील निखळ प्रेम आणि भावनांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. या आठवणीने कुटुंबीयांसह परिसरातील अनेकांचे मन हेलावले. गणेशोत्सव अशा अनेक नात्यांना अधिक घट्ट करणारा असतो याची प्रचिती या प्रसंगातून आली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 50 हजार उकळले, ब्लॅकमेलिंगला कंटाळत तरुणानं… महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा शेवट म्हणजे मोठ्या जल्लोषात आणि भावनिक वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दहा दिवस भक्ती, आनंद आणि उत्साहाने साजरा झाल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण शहर, गाव आणि परिसर बाप्पाच्या गौरवाने उजळून निघाला. विसर्जनाच्या दिवशी ढोल-ताशांचा गजर, लेझीम नृत्य आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या गजर भक्तांनी केला. मोठ्या मिरवणुकीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा