Headlines

‘एसी’मुळे सामान्य लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, पनवेल रेल्वे स्थानकावरील भार वाढला; दररोज प्रवाशांची गर्दी| Maharashtra Times


Mumbai AC Local: पनवेल रेल्वे स्थानकावर दररोज पनवेल-सीएसएमटी मार्गावरील प्रवासी आणि पेण-रोहा पॅसेंजर एक्सप्रेसमधील प्रवासीही दाखल होतात. यामुळे आधीपासूनच या स्थानकावर तणाव पडतो त्यात एसी लोकलमुळे हा भार आणखी वाढला आहे.

panvel railway station rush
नवी मुंबई: मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर यंदा प्रजासत्ताक दिनापासून 14 नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू केल्या होत्या. यामुळे प्रवाशांना सुखकर अनुभव मिळणार असल्याची आशा होती परंतु, प्रत्यक्षात उलटच घडत आहे. हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली असून प्रवाशांना अनेक वेळा चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

सामान्य लोकलऐवजी एसी फेऱ्या

मध्य रेल्वेवर सध्या 94 एसी लोकल फेऱ्या धावतात. यापैकी 14 फेऱ्या दोन महिन्यांपूर्वी हार्बर मार्गावर सुरू करण्यात आला होता. परंतु, यावेळी लोकल ट्रेनच्या संख्येमध्ये वाढ केली नव्हती. नियमित वेळापत्रकामध्येच सामान्य लोकलऐवजी एसी फेऱ्या सुरू केल्या. यामुळे सकाळी, दुपारी आणि सायंकाळी 14 सामान्य लोकल फेऱ्यांचं रुपांतर एसी लोकलमध्ये झालं. याचा परिणाम सामान्य लोकल फेऱ्यांवर झाल्यामुळे वेळापत्रक कोलमडलं आणि प्रवाशांची स्थानकावर गर्दी वाढू लागली आहे.

Maharashtra TimesMumbai Local: 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार, वांद्रे स्थानकावरूनही सुरू होणार; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर

एका लोकलमुळे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत

प्रवाशांनी ‘मुंबई मिरर’सोबत बोलताना एसी लोकल नेहमी विलंबाने धावत असल्याची माहिती दिली. सकाळी 9.09 ला पनवेल स्थानकावरून सुटणारी लोकल बहुतेकदा सकाळी 9.26 वाजता सुटते. यामुळे त्यामागच्या 9.17, 9.28 आणि 9.32 या सामान्य लोकलही विलंबाने सुटतात. वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांपैक्षा विनावातानुकूलित प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दररोज प्रवासी ताटकळत राहतात. सामान्य लोकल येईपर्यंत या गाड्या भरलेल्या असतात.

पनवेल रेल्वे स्थानकावर यापूर्वीच प्रवाशांची संख्या मोठी होती. हार्बर मार्गावरील प्रवाशांसह पेण व रोह्यावरून येणाऱ्या प्रवासी ही याच स्थानकावर उतरतात. तसेच, प्लॅटफॉर्मवरून नवीन पनवेलकडे पोहोचण्यासाठी तब्बल 70 पायऱ्यांचा जिना चढावा लागतो. जेव्हा दोन्ही मार्गावरील प्रवासी एकत्र स्थानकावर दाखल होतात तेव्हा या जिन्यांवर चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होते.

Maharashtra TimesMumbai Local: 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार, वांद्रे स्थानकावरूनही सुरू होणार; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर

पासच्या दरांवर प्रश्न

दरम्यान, सीएसएमटी ते पनवेल 49 किमी अंतर असून एसी लोकलचा मासिक पास 2225 रुपयांचा असतो. तेच, सीएसएमटी ते डोंबिवलीपर्यंत अंतर समान असून एसी लोकलच्या मासिक पास 2050 रुपये आहे. दरम्यान, हार्बर मार्गावरील सामान्य मासिक पाससुद्धा 370 रुपये असून तोच सीएसएमटी ते डोंबिवली 300 रुपये आहे. त्यामुळे नागरिकांनी या दरांवरती ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा