Nandita Patkar Ashadhi Wari:विठूरायाच्या दर्शनाची ओढ प्रत्येक वारकऱ्याला असते. अनेक मराठी कलाकारही यंदा वारीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकदा तरी वारी अनुभवावी, असं प्रत्येकजण सांगतोय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
आषाढीच्या वारीत अनेक जण सहभागी होतात आणि आयुष्यभरासाठी या एक सुंदर अनुभव जगून जातात. काही कलाकार मंडळीही दरवर्षी हा अनुभव घेत असतात. काही जण वारीत सहभागी होतात, तर काही वारकऱ्यांची सेवा करत नकळतपणे विठुरायाचं दर्शन घेत असतात. अभिनेत्री नंदिता पाटकर हिनं असाच सेवेतून वारीचा आनंद नुकताच घेतला. आषाढी वारीतून धार्मिक भावाव्यतीरिक्त माणुसकी, शिस्त, सेवा आणि समर्पण दिसून येतं. वारीत सकारात्मक ऊर्जा आणि निखळ आनंद मिळाल्याचं नंदितानं ‘मुंटा’ला सांगितलं. यंदा ती तिसऱ्यांदा वारीत सामील झाली होती. एका ग्रुपबरोबर चहा-बिस्किटांचं वाटप करत स्वयंसेवक म्हणून ती बारामतीत गेली होती.
नंदितानं या अनुभवाविषयी सांगितलं, ‘अनेक वर्षांपासून वारी पूर्ण पायी चालण्याची इच्छा मनात आहे. मात्र अद्याप तो योग जुळून आला नाही. तरीही यंदा बारामती परिसरातून पालखी मार्गावरून जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. सकाळी साडेसहा वाजल्यापासून वारकरी पालखीच्या मार्गानं चालत असतात. त्यावेळी त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटांची व्यवस्था करण्याचा उपक्रम देशपांडे कुटुंबीयांनी केला होता. त्यांच्याबरोबर स्वयंसेवक म्हणून मी सामील झाले. संत तुकोबारायांची पालखी या रस्त्यातून मार्गस्थ होत असते. चहापानाची सेवा करताना दोन पावलं चालण्याची, वारकऱ्यांशी संवाद साधण्याची, त्यांच्या अनुभवांविषयी जाणून घेण्याची संधी मिळते. अनेक वर्षांपासून अखंड वारी करणाऱ्या वारकऱ्यांची श्रद्धा, शिस्त आणि समाधान पाहून मी भारावून जाते.’
Pandharpur | पंढरपुरात आषाढी वारीनिमित्तानं व्हिआयपी दर्शन बंद तर रांगेतील भक्तांसाठी खास सोय-सुविधा
‘वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हे कोणत्याही सुखापेक्षा मोठं असतं. सकाळच्या प्रवासात मिळालेला एक कप गरम चहा आणि दोन प्रेमाचे शब्द त्यांच्यासाठी किती मोलाचे असतात, याची जाणीव या सेवेदरम्यान होते. वारीत सहभागी होण्याइतकंच वारकऱ्यांची सेवा करणंही एक आत्मिक समाधान देणारं काम आह’, असं नंदिता आवर्जून नमूद करते.
वारीच्या निमित्तानं समाजातील प्रत्येकानं आपल्या परीनं सेवाभाव जपावा. प्रत्यक्ष पायी वारी करता आली नाही, तरी वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणं, त्यांच्या प्रवासाला हातभार लावणं आणि त्यांच्याकडून श्रद्धा, संयम व समतेचा संदेश घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. -नंदिता पाटकर
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा