Headlines

एका वेळी एक रात्र : ड्रीमस्टेशनसह पहिल्या वेळेच्या CPAP/BiPAP चिंतातुरतेवर मात करू. – obstructive-sleep-sp apnea-cpap-bipap-therapy-philips-dreamstation


प्रत्येक माणूस वेगळा असतो, आपल्या व्यक्तिमत्त्वापासून आपल्या झोपायच्या सवयींपर्यंत. काहीजणांना उशीवर डोके टेकल्या-टेकल्या झोप लागते, तर काहींना विचार करत करत बसावे लागते. ज्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया किंवा OSA असतो, त्यांच्यासमोर वेगळेच आव्हान असते – मोठ्याने घोरणे, वरच्या श्वसनमार्गामध्ये वारंवार पूर्ण किंवा अर्धवट अडथळे निर्माण होणे ज्यांमुळे झोपेत व्यत्यय येणे आणि त्यामुळे दिवसभर खूप सुस्तावल्यासारखे वाटत राहणे. 1

भारतामध्ये, सुमारे 30.5% लोकांना मध्यम ते तीव्र तीव्रतेचा OSA असतो, आणि वयाच्या 50व्या वर्षानंतर त्याचे प्रमाण खूप वाढत जाते. 2 तुम्ही किती व्यवस्थित झोपता हे महत्त्वाचे ठरते, कारण अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक, मानसिक आरोग्यावर आणि जीवनमानावर परिणाम होतो. 1 तुम्ही सकाळी जागे झाल्यावर तुम्हाला ताजेतवाने, टवटवीत, आणि अंगात उत्साह असल्यासारखे वाटते आणि तणाव कमी असल्यासारखे वाटते, तेव्हा चांगली झोप लागली होती हे लक्षात येते. 3

OSA असलेल्या रुग्णांसाठी, सहज श्वास घेता यावा आणि ताजेतवाने वाटावे म्हणून जेव्हा डॉक्टर CPAP किंवा BiPAP थेरपी सुचवतात, तेव्हा सर्वांत आधी तुम्हाला बरे वाटायला हवे. पण कधीकधी, प्रथमच वापर करणाऱ्या रुग्णांना त्यांच्या स्वत:च्या काही मर्यादा अडकवून ठेवू शकतात, आणि काहीजणांना अख्खा उपचारच सोडून द्यावा लागू शकतो.

obstructive sleep apnea<br>

एका अभ्यासातून असा अहवाल समोर आला की मास्कमुळे क्लॉस्ट्रोफोबिया जाणवणे हे रुग्णांनी उपचार पूर्ण न करण्याचे एक कारण होते.4

डॉ. समीर डी. गर्डे, रेस्पिरेटरी डिसीझेस, इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजी आणि क्रिटिकल केअर कन्सल्टंट, हॉनररी कन्सल्टंट, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई यांनी आपले मत मांडले – ‘‘हा खरा तर शरीरशास्त्राशी संबंध नसलेला एक विषय आहे; आपल्याला तोंडाला एक मशीन लावून झोपायचे आहे, ज्यात चेहऱ्यावर मास्क बसवलेला असेल, आणि मग अशा अवस्थेत अख्खी रात्र तो मास्क लावून आपल्याला झोपायचे आहे. हे मशीन रुग्णाच्या श्वसन यंत्रणेमध्ये हवा भरते आहे. अगदी स्पष्ट सांगायचे, तर ही कल्पना कोणालाही अस्वस्थ करू शकते. पहिला अडथळा असतो निदानाचा स्वीकार करणे. दुसरा असतो की मला मास्क लावावा लागणे हे किती कृत्रिम आहे, आणि त्यामुळे मला क्लॉस्ट्रोफोबिक वाटू शकते. आणि तिसरा अडथळा असतो की मशीन माझ्या श्वसन यंत्रणेवर जरा जास्तच दाब देत आहे. या अडथळ्यांवर नीट काऊन्सिलिंग (समुपदेशन) करूनच मात करता येते, कधीकधी एका काऊन्सिलिंगमध्ये नाही, तर पुन्हा पुन्हा काऊन्सिलिंग करावे लागते.’’

तुम्हाला सुरुवात करतानाच काळजी वाटत असेल, तर असे वाटणारे तुम्ही एकटे नाही. समजा, तुमचे थेरपी डिव्हाइस जर तुमच्या गरजेनुरुप, आणि तुम्हाला दर रात्रीत सहज आराम मिळेल असे घडवलेले असेल तर?

चला भीती मागे सारूया, ड्रीमस्टेशनसह ॲडप्ट करूया.*

कोणतेही PAP डिव्हाईस कसे काम करते ते समजून घेणे हे तुमच्या आरोग्याचे व्यवस्थापन करण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असते. प्रथमच वापर करणाऱ्या व्यक्तीसाठी, हा आव्हानाचा आणि अनोळखी विषय ठरू शकतो. अशा प्रकरणांत, डिव्हाईस समजून घेतल्याने खूप फरक पडू शकतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मशीनसोबतचा सुरुवातीचा अनुभव कोणत्याही PAP डिव्हाईसच्या दीर्घकालीन वापरासाठी महत्त्वाचा ठरणारा घटक असतो. 5

डॉ. समीर डी. गर्डे, रेस्पिरेटरी डिसीझेस, इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजी आणि क्रिटिकल केअर कन्सल्टंट, हॉनररी कन्सल्टंट, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई यांनी या विषयावर आपले मत मांडले – ‘‘काऊन्सिलिंग (समुपदेशन) खूप महत्त्वाचे असते. डॉक्टरांना कधीकधी संयमाने दोन, तीन किंवा कदाचित चार काऊन्सिलिंग सेशन्स करावी लागतात, कारण त्यांचे अनेक प्रश्न असतात. सुरुवातीला अगदी लहान मुलासारखे सांगावे लागते आणि पाठपुरावा करून ते पालन करत आहेत ना हे पाहणे फार महत्त्वाचे असते. या प्रकारच्या संवादातूनच हे सुरुवातीचे अडथळे बाजूला सारण्याची आशा बाळगता येते, ज्यामुळे पुढचे 15 दिवस जर त्यांनी त्याचा स्वीकार केला, तर मग आयुष्यभर त्याचा स्वीकार जास्त चांगल्या रीतीने होतो, असे आम्हाला दिसून आले आहे.’

फिलिप्स ड्रीमस्टेशन हे जाणते की कोणत्याही PAP मशीनची सवय लागायला थोडा वेळ लागतो आणि प्रत्येक वापरकर्त्याच्या गरजा वेगळ्या असतात हे समजते. *

ड्रीमस्टेशन : मूलभूत गोष्टी समजून घेऊ

ईझीस्टार्ट : दिवसागणिक हवेचा प्रवाह अलगदपणे वाढवून तुम्हाला सहज सवय लागण्यास मदत करते.6

सी-फ्लेक्स आणि ए-फ्लेक्स : तुम्ही श्वास सोडता तेव्हा आपोआप दाब कमी करते, ज्यामुळे प्रत्येक श्वास नैसर्गिक आणि सोपा वाटतो.6

स्मार्टरॅम्प : तुम्हाला कमी हवेच्या दाबात झोप लागण्यास मदत करतो.6

ड्रीमवेअर मास्क : तुमच्या चेहऱ्यावर जवळजवळ काहीच नसल्यासारखे भासेल अशा रीतीने तयार केलेले, हालचाल करता येते आणि कम्फर्टेबल होता येते.6

ड्रीमस्टेशनसह निवांत व्हा आणि सहजपणे श्वास घ्या – तुमच्या शांतीसाठी आणि सोयीसाठी घडवलेली थेरपी. ही सुरक्षितपणे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी कनेक्ट करते, ज्यामुळे तुम्हाला नेहमीच पाठबळ मिळाल्यासारखे वाटते, आत्मविश्वास वाढतो आणि रात्रीची झोप सुधारण्याच्या योग्य वाटेची अनुभूती मिळते. 6

एक असे डिव्हाईस निवडा जे हे स्थित्यंतर सुरळीत आणि तणावमुक्त करण्यास मदत करते. तुमचे पर्याय पाहा आणि तुम्हाला अनुरूप ठरणारा योग्य उपाय शोधण्यासाठी तुमच्या फिजिशिअनचा सल्ला घ्या. भीतीला तुमच्या आजच्या आणि उद्याच्या उत्साही, जिवंत व्यक्तिमत्त्वाच्या आड येऊ देऊ नका. शारलेट ब्राँटे यांनी लिहिलेलेच आहे, ‘‘A ruffled mind makes a restless pillow. (मन अस्वस्थ असेल तर झोप नीट लागत नाही.)”

जर तुम्हाला तुमच्या डिव्हाईसची चिंता लागून राहिली असेल, तर ड्रीमस्टेशन तुमचा प्रवास अधिक आल्हाददायक कसा करू शकते ते येथे पाहा :

philips.co.in/c-e/hs/sleep-apnea-therapy/sleep-apnea-machines.html.

*Disclaimer:

This article is intended for general informational purposes only and does not constitute medical advice. The content reflects Philips’ understanding of user experiences with PAP therapy. The Philips DreamStation is a regulated medical device, and its use should be based on a prescription and guidance from a qualified healthcare professional. Individual experiences with CPAP/BiPAP therapy may vary, and readers should consult their physician or respiratory therapist before initiating or modifying treatment. Philips makes no guarantees regarding outcomes beyond those supported by approved indications and regulatory clearances. Users should consult their physician or respiratory therapist for personalized medical advice.

References:

  • Slowik JM, Sankari A, Collen JF. Obstructive Sleep Apnea. [Updated 2025 Mar 4]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2026 Jan-. Available from: ncbi.nlm.nih.gov/books/NBK459252/
  • Datta K, Bhutambare A, Mallick HN. Systematic review of prevalence of sleep problems in India: A wake-up call for promotion of sleep health. medRxiv. 2023:2023-12.
  • Spytska L. The importance of quality sleep and its relationship with physical and mental health: a systematic review. sleep medicine research. 2024;15(3):162-72.
  • Goyal A, Agarwal N, Pakhare A. Barriers to CPAP Use in India: An Exploratory Study. J Clin Sleep Med. 2017 Dec 15;13(12):1385-1394. doi: 10.5664/jcsm.6830. PMID: 29065952; PMCID: PMC5695984.
  • Goyal A, Joshi A, Mitra A, et al. Predictive factors for CPAP failure in obstructive sleep apnea patients. Lung India. 2021;38(6):540-4.
  • Philips. Available from philips.co.in/healthcare/product/HCNOCTN447/dreamstation-cpap-bipap-cpap-bi-level-therapy-systems. Accessed on 27th May 2026.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत