चेन्नई:’ टॉक्सिक ‘ सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. आता राजकीय क्षेत्रातूनही सिनेमावर टीका होताना दिसतेय. माजी आयपीएस अधिकारी आणि राजकीय नेते के. अन्नामलाई यांनी भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील आक्षेपार्ह विषय, अत्यंत हिंसाचार आणि महिलांचे आक्षेपार्ह चित्रण यांवर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
कुणाचंही तसंच कोणत्याही सिनेमाचं थेट नाव न घेता, अलिकडंच प्रदर्शित झालेल्या ‘टॉक्सिक‘ चित्रपटातील दृश्यांचा संदर्भ देत अन्नामलाई म्हणाले की, अशा आशयाचे चित्रपट देशातील तरुण आणि विद्यार्थी वर्गाला पूर्णपणे उद्ध्वस्त करत आहेत.
एकीकडं आपण महिला सक्षमीकरण आणि महिलांवरील अत्याचारांवर मोठी भाषण देतो, तर दुसरीकडं चित्रपटांमध्ये महिलांना केवळ एक उपभोगाची वस्तू म्हणून दाखवलं जातं. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका चित्रपटात तर एकाच वेळी ‘पत्नी आणि प्रेयसी’ दोन्ही ठेवता येतात, असं चित्र दाखवण्यात आलं आहे, असा घणाघात अन्नामलाई यांनी केला.
सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्न
चित्रपटसृष्टी हे एक अतिशय शक्तिशाली माध्यम आहे. कोणताही मोठा स्टार अभिनय करत असला, तरी सेन्सॉर बोर्डानं नियमावलीचे काटेकोर पालन केलं पाहिजे आणि काय दाखवायचं व काय नाही, हे स्पष्ट ठरवलं पाहिजे.
तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये वयोमर्यादेचे नियम अतिशय कडक असतात. भारतात मात्र ‘A’ प्रमाणपत्र मिळूनही चित्रपटगृहांमध्ये कोणत्याही वयाच्या प्रेक्षकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
बंदी नव्हे, कडक सेन्सॉरशिप आवश्यक
माझं म्हणणे चित्रपटांवर बंदी घालावी असं नाही, तर चित्रपटांची सेन्सॉरशिप योग्य आणि कडक पद्धतीनं व्हावी अशी आहे, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
गीतू मोहनदास दिग्दर्शित आणि यश अभिनीत ‘टॉक्सिक’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्यातील अति-हिंसाचार आणि सीन्समुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाला एकही कट न देता ‘A’ प्रमाणपत्र दिल्यानं सध्या समाजमाध्यमांवर तसंच राजकीय वर्तुळात बोर्डाच्या कारभारावर टीका होत आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा