Rishbh Pant Record : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत कसोटी सामन्यातील स्टम्प माईकमधील कॉमेन्ट्रीमध्ये चर्चेत असतो. आपल्या आडवातिडव्या बॅटिंगमुळे नेहमी टीकेचा धनी ठरतो. पण कसोटी क्रिकेटमध्ये टी-२० शैलीत फलंदाजी करण्यामुळे त्याने मोठा विक्रम नावावर केलाय. विराट, रोहित आणि कॅप्टन गिललाही मागे टाकलं आहे.
Rishabh Pant Record ind vs sl 1st test(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस सुरू आहे. भारताला जिंकण्यासाठी सहा विकेटची तर श्रीलंका संघाला ३७२ धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्याने यजमान श्रीलंका बॅकफूटला गेले आहेत. भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याने दुसऱ्या डावामध्ये ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताला मोठी आघाडी मिळवण्यात यश मिळवून दिली होती. ऋषभची खेळी पाहिल्यावर लक्षात येईल की टी-२० शैलीत त्याची आक्रमक फचकेबाजीचा हटके अंदाज पाहायला मिळते, कोणी कितीही टीका करूदेत पण तो गडी त्याच्याच पद्धतीने खेळत असतो. या कसोटीत त्याने एकूण १०५ धावा काढल्या आहेत. या धावांनी पंतने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या स्पर्धेत ऋषभ पंत हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. हा विक्रम अगोदर कॅप्टन शुभमन गिल याच्या नावावर होता. मात्र त्याला मागे टाकत पंतने नंबर वन स्थान गाठले आहे. आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ४१ सामन्यातील ७३ डावांमध्ये त्याने २८८५ धावा केल्या आहेत. कॅप्टन गिलनेही ४१ सामन्यात २८६७ धावा केल्या असून दोघांमध्ये फार काही अंतर नाहीये. या सामन्यामध्ये गिलची बॅट थंड दिसली. या यादीमध्ये रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी २७१६ आणि विराट कोहली २६१७ पाव्या स्थानावर आहेत. दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडेही पुन्हा नंबर वन होण्याची दाट शक्यता आहे. दोघांमध्ये ३००० धावांचा टप्पा पहिल्यांदा कोण ओलांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
IND vs SL Test : भारताला ऐतिहासिक 600 वी कसोटी जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज, श्रीलंका ड्रॉ करण्यासाठी ताकद लावणार, गिलच्या एक्क्याकडून सर्वांना अपेक्षाऋषभ पंतने आणखीन एक विक्रम नावावर केला असून कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार लगावणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार मारण्याचा विक्रम त्याने नावावर केला असून त्याच्या तोडफोड बॅटिंग स्टाईलमुळे त्याने हा आकडा गाठला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत पंत आणि गिलख्रिस्ट तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. पहिल्या स्थानी बेन स्टोक्स १३८ आणि दुसऱ्या ब्रँडन मॅक्युलम १०७ आहेत. पंत या विक्रमापासून फक्त ७ षटकार मागे आहेत. तर पहिल्या स्थानी असलेल्या स्टोक्सला मागे टाकण्याची त्याला मोठी संधी आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा